कोरपना…
केंद्र शासनाने शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी गडचांदूर कडकडीत बंद
गडचांदूर-आदीलाबाद महामार्गावर निदर्शने व रस्ता जाम
कोरपना-
केंद्र शासनाने कृषि विषयक तीन कायदे पारित केलेले आहेत, त्यास विरोध म्हणून देशातील विविध संघटनांतर्फे ८ डिसेंबर २०२० रोजी भारत देश बंदचे आवाहन केले होते.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पिरिपा, रिपाई तसेच प्रहार, मनसे, वंचित बहुजन आघाडी, किसान युनियन व इतर पक्षाने या आंदोलनात सहभाग घेत बंदला पाठींबा देवून या शेतकरी विरोधी कायद्यांचा निषेध करीत गट चंद्रात शहरभर रॅली काढून केंद्र सरकार विरोधात निदर्शने केले. यावेळी काही वेळेसाठी रस्ता गडचांदूर- आदीलाबाद रस्ता बंद करण्यात आला होता.
कृषीप्रधान देशात शेतकरी विरोधी कायदे होवू देणार नाही अशी भुमिका घेऊन राष्ट्रीय कृषी कायद्याविरोधात देशभरात वातावरण तापले आहे, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करून शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख अरुण निमजे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख धनंजय छाजेड, नगराध्यक्ष सविता टेकाम उपनगराध्यक्ष शरद जोगी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, पापाया पोन्नमवार, गटनेता विक्रम येरणे, सागर ठाकुरवार, सचिन भोयर, रफिक निजामी, मनोज भोजेकर, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशिष देरकर, नासिर खान, शेख अहमद भाई, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजुरकर, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष महाडोळे, अक्षय गोरे, नगरसेविका कल्पना निमजे, मिनाक्षी एकरे, अर्चना वांढरे, जयश्री ताकसांडे, अश्विनी कांबळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश चुधरी, वंचित बहुजन आघाडीचे मधुकर चुनारकर, मनसेचे महालिंग कंठाळे, आकाश वराठे, मुन, प्रहार’चे सतीश बिडकर, आशिष वांढरे, अतुल गोरे, प्रणय टेकाम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
प्रतिकार न्यूज