Home Breaking News डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारला अभिवादन कार्यक्रम संपन्न…

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारला अभिवादन कार्यक्रम संपन्न…

118
0
  • राजुरा. ..

राजुरा येथील आंबेडकर वार्ड क्र 2 येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारला अभिवादन करण्यात आले.

सुरवातीला मिलींद बुद्ध विहार येथे आयु. गोरखनाथ वाघमारे यांच्या शुभ हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून धवजा रोहन करण्यात आले.
त्यानंतर डॉ. आंबेडकर भवनामध्ये कु मानवी हिच्या शुभ हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करण्यात आले व आयु संजय माथनकर यांच्या हस्ते धवजा रोहन करण्यात आले .
भास्कर सर , श्री योगेश करमनकर , संदेश करमनकर , श्रीपत वनकर , बबन वाघमारे , अनिल मून , छोटेबाबा करमनकर , कु मानवी , जान्हवी , श्री महादेव चहारे , अरविंद मालखेडे , संजय मालवणकर , सतिश मालवणकर , सुभाष चांदेकर , कु. पिऊ कु. प्रतिक यांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन भास्कर सर यांनी केले असे सामजिक कार्यकर्ता , भास्कर सर कळवितात .

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here