राजुरा…
-
* ७ डिसेंबरला वि.रा.आंदोलन समितीचे आंदोलन
* चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात होणार ठिय्या आंदोलन
- चंद्रपूर, दिनांक 6 डिसेंबर-
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने दिनांक ७ डिसेंबर, रोज सोमवारला दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका स्थळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वैदर्भीय नागरिक आणि शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा आंदोलन समितीने केले आहे.
कोरोना काळातील वीजबिल माफ करावे, वीज बिलात लावण्यात येणारे अधिभार रद्द करावे, दोनशे युनीट पर्यंतचे वीजबिल माफ करावे, शेती पंपावरील भारनियमन रद्द करावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना सरसकट हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्यावी, यासह अनेक मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुक्यात हे ठिय्या आंदोलन होणार आहे. जीवती तालुकास्थळी डॉ.आंबेडकर यांचा पुतळा नसल्याने तहसील कार्यालयापुढे हे आंदोलन होणार असून जिल्ह्यातील ईतर सर्व चौदाही तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे हे आंदोलन होणार आहे. आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आंदोलन समितीचे नेते अँड. वामनराव चटप, अँड.मोरेश्वरराव टेमुर्डे, जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार,अँड.मुरलीधर देवाळकर, किशोर दहिकर,मितीन भागवत, प्रभाकर दिवे,अरुण नवले,नीलकंठ कोरांगे, अँड. शरद कारेकर, हिराचंद बोरकुटे,कपिल इद्दे,बंडू राजूरकर,अँड.श्रीनिवास मुसळे,रमाकांत मालेकर,रमेश नळे,सुधीर सातपुते, तुकेश वानोडे, गिरीधर बैस,प्रभाकर ढवस,अनिल दिकोंडावार,गोपी मित्रा,अरुण वासलकर,व्यंकटेश मल्लेलवार, डॉ.संजय लोहे,कवडू येनप्रेडीवार, अँड.श्रीनिवास मुसळे,शब्बीर जागीरदार,देवीदास वारे,सय्यद ईस्माईल यांनी केले आहे.
प्रतिकार न्युज