Home विशेष माझे साहेब – बाबासाहेब

माझे साहेब – बाबासाहेब

3
0

🔴  माझे साहेब – बाबासाहेब

साहेब आमच्यावर
का रुसलात,
दिन,दलित समाजाला
पोरकं करुन गेलात….
शिका आणि संघटीत व्हा
असा संदेश दिलात,
देशाच्या घटनेतून सर्वांना 
न्याय तुम्ही दिलात….
साहेब तुम्ही कधी
नाही स्वार्थी झालात,
मान,अपमान सहन करुन
देशासाठी जिद्दीने लढलात….
आता तुम्हांला सारे
वंदन करतात,
तुमच्या घटनेला
जगभरात गौरवतात….
साहेब तुम्ही अजून 
काही काळ असता,
जातीभेद करणाऱ्यांना
माणुस कळला असता….
नष्ट झाली असती
सर्व विषमता,
रुजवीली असती
सर्वत्र समता….
आजच्या महापरिनिर्वाण 
दिनाला,
विनंती करतो
देवाला….
सुखी ठेव
माझ्या बाबासाहेबाला,
नतमस्तक होतो
त्यांच्या कार्याला….
शेवटी एकच
हाक सर्वाला,
जय भीम बोला
जय भीम बोला….

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here