आता बल्लारपूर येथील जयसूख यांच्या गोडाऊन वर कधी पडणार धाड ? जनतेची इच्छा.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यात वसिम अख्तर व जयसूख ह्या जोडगोळीने कोरोना संक्रमणच्या काळात कोट्यावधी रुपयाचा सुगंधीत तंबाखू व घुटका विक्री करून कोट्यावधी रुपयाचा नफा कमावला तर दुसरीकडे आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अधिकारी यांच्यासोबत त्यांची अंतर्गत सेट्टिंग असल्याची चर्चा होती, मात्र दिनांक 03/12/2020 रोजी वसीम अख्तर झिमरी यांच्या गोडाऊन प्लॉट नं. ई-69, दाताळा येथे अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाद्वारे 8 लाख 25 हजार 800 रुपये किंमतीचा प्रतिबंधित पानमसाला जप्त करुन तो ताब्यात घेतला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत एकुण कारवाईत 58 लाख 48 हजार 388 रूपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
वसिम अख्तर यांच्या एमआयडीसी गोडाऊन चंद्रपूर मधून रजनीगंधा पान मसाला 129.6 गॅ., 22 नग, वजन 2.85,किंमत रु. 11 हजार 880, विमल पान मसाला 99 गॅ., 38 नग, वजन 3.76, किंमत रु.4 हजार 560, मजा हुक्का शिशा तंबाखु 200 गॅ. 1072 नग, वजन 214.4, किंमत 80 हजार 9360 असा एकूण 8 लाख 25 हजार 800 किंमतीचा साठा ताब्यात घेतलेला आहे. व पोलीस स्टेशन, पडोली येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
आता वसिम अख्तर च्या गोडाऊन वर धाडी प्रमाणे बल्लारपूर येथील जयसूख च्या गोडाऊन वर अन्न औषधी प्रशासन कारवाई करतील का ? असा प्रश्न या निमित्याने विचारल्या जात आहे.