Home आपला जिल्हा मराठी चित्रपटात काम करण्याची संधी

मराठी चित्रपटात काम करण्याची संधी

8
0

चंद्रपूर – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांचा मान्यतेने एलीवेट फिल्म्स आणि लावण्याप्रिया आर्ट्स ह्यांच्या सयुक्त विद्यमानाने तयार होत असलेल्या ‘पल्याड’ या मराठी चित्रपटासाठी ५ आणि ६ डिसेंबर २०२० ला सकाळी ११ ते ६ या वेळेत निशुल्क ऑडीशन घेण्यात येणार आहे. चित्रपटात ५ ते १० वयोगटातील मुल आणि मुलींसाठी तसेच २० ते ६० वयोगटातील महिला व पुरुषाचे ऑडीशन घेण्यात येणार आहे. ऑडीशन चे ठिकाण कल्पना पिदुरकर, सेंट माइकल शाळेजवळ, हिवरे प्लाझाच्या बाजूला, रामनगर, चंद्रपूर येथे आयोजित केले आहे. तरी चंद्रपूर मधील कलाकारांनी या संधीचा फायदा घ्यावा अशी अपेक्षा ‘पल्याड’ च्या टीमने केले आहे. कलाकारांनी आपल्या ऑडिशन ची पूर्व तयारी येताना करून यावी तसेच ऑडिशन ठरवलेल्या नियोजित वेळेत सुरु होईल.. ऑडीशनला येताना मास्क आणि स्यानिटाइझर सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here