Home कृषी इंदाराम येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे...

इंदाराम येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे शुभारंभ*

6
0

अहेरी…

*इंदाराम येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे शुभारंभ*

आदिवासी विकास महामंडळ, उप-प्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सोबत माजी सरपंच इंदाराम गुलाबराव सोयम,ग्राम पंचायत वेंकटराव पेठाचे सरपंच संपत सिडाम, उपसरपंच श्यामराव राऊत,उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे या हंगामातील धान मळणीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून या हंगामाच्या धान खरेदी केंद्राचे बुधवार 2 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांनी इंदाराम येथे विधिवत धान खरेदी केंद्राचे शुभारंभ केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडलावार यांनी, शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट शासकीय गोदामात आणून धानाची विक्री करावी कारण धानाला योग्य भाव व दरासह बोनसही मिळते. याचा लाभ शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांनी यावेळी केले.
धान खरेदी केंद्राच्या शुभारंभाच्या वेळी आदिवासी विविध सहकारी संस्थेचे अध्यक्षसह ग्रामसेवक किरंगे,बी.जी.गावडे सर,वसंत मेश्राम,तुमळे,जयराम आत्राम,मुसली आत्राम,जाबीर शेख,बीचु मडावी,राजू वाघाडे,बाबूजी कत्तीवार,लालू मडावी,फकिरा पेंदाम,बुध्दाजी सोयाम,रोशन सामालवारआदी उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here