Home Breaking News शीतल आमटे प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद – अरविंद साळवे, जिल्हा पोलिस अधीक्षक

शीतल आमटे प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद – अरविंद साळवे, जिल्हा पोलिस अधीक्षक

52
0

वरोरा – प्रसिद्ध समाजसेविका आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूच्या बातमीने सामाजिक, राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
काही दिवसांपूर्वी मानसिक तणावात असलेल्या डॉ. शीतल आमटे यांनी आपल्या मनातील भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा व्यक्त केल्या, 22 नोव्हेंबरला आमटे कुटुंबियांकडून शीतल आमटे यांच्याद्वारे समाज माध्यमांवर उमटत असलेल्या प्रतिक्रियेशी आम्ही सहमत नाही असे निवेदन दिले.
डॉ. शीतल आमटे यांना नेमका कोणत्या गोष्टीचा तणाव होता ह्या सर्व गोष्टी त्यांच्यासोबतच निघून गेल्या.
चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी या प्रकरणी प्रसार माध्यमांना माहिती देताना सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती दिली, शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत काहीही भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ शीतल आमटे यांच्या पार्थिवाला आनंदवनातील श्रद्धावन याठिकाणी दफनविधी आटोपण्यात आले.

या दुःखाच्या क्षणी वरोरा व आनंदवन परिसरातील अनेक नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here