Home Breaking News जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च करण्याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी

जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च करण्याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी

48
0

चंद्रपुर…

जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च करण्याची दक्षता घ्या
– जिल्हाधिकारी

चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर : जिल्ह्यातील विकास कामांकरिता जिल्हा नियोजन समितीद्वारे 100 टक्के निधी उपलब्ध करून दिल्या जाणार असून सदर निधी विहित वेळेत खर्च करण्याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज सर्व विभागप्रमुखांना दिले.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती योजना व आदिवासी उपयोजनेच्या खर्चासंबंधी केलेल्या नियोजनाचा जिल्हाधिकारी यांनी आज नियोजन भवन येथे आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुल्हाने पुढे म्हणाले की यापुर्वी शासनाकडून केवळ 33 टक्केच निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना होत्या, आता मात्र पुर्ण 100 टक्के निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या सुधारित सुचना प्राप्त झाल्या आहेत. तरी सर्व विभाग प्रमुखांनी त्यांना मंजूर करण्यात आलेला पुर्ण निधी खर्च करण्यासाठी पुढील दहा दिवसात नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी समजाकल्याण विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, सिंचन, आदिवासी विकास, कृषी, आरोग्य, नगरविकास व इतर विभागांचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here