Home क्राइम गैर अर्जदार सहायक पोलीस निरीक्षक चांहादे घुघ्घुस यांचा बचाव करण्यासाठी सहायक पोलीस...

गैर अर्जदार सहायक पोलीस निरीक्षक चांहादे घुघ्घुस यांचा बचाव करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक नागलोत यानी खोटा अहवाल तयार केल्याने प्रिया झाबंरे यांनी वरिष्ठांनकडे लेखी तक्रार देऊन कारवाई ची मागणी केली आहे.

3
0

प्रतिकार

प्रिया झांबरे

बल्लारपुर /विशेष प्रतिनिधी

मागील पाच महिन्यापासुन वढा घाट प्रकरणात घुघ्घुस पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक चांहादे तपास करीत होते. चाहांदे नी कोणत्याही प्रकारचा तपास/विचारपुस न करता आपल्याच मताने बयान नोंदविला. चौकशीत लक्ष न देता.  गैर अर्जदार सहायक पोलीस निरीक्षक चांहादे घुघ्घुस यांचा बचाव करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक नागलोत यानी खोटा अहवाल तयार केल्याने प्रिया झाबंरे यांनी वरिष्ठांनकडे लेखी तक्रार देऊन कारवाई ची मागणी केली आहे. चांहादे यांनी प्रिया झाबंरे यांच्या वैयक्तिक जिवनात लक्ष देऊन वारंवार अपमानीत केले. त्यामुळे झांबरे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रपुर, पोलीस अधिक्षक यांना वारवांर लिखीत तक्रार देण्यात आली , तसेच गृहमंत्री अनिल देशमुख महोदय यांना मेल द्वारे पाठविण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेडकर साहेब यांनी तक्रार घुघ्घुस पोलिस स्टेशन ला पाठविली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागलोत कडे तपास दिला. तपास झाल्यानंतर सुद्धा घुघ्घुस पोलिस स्टेशन ला चांहादे विरुद्घ गुन्हा दाखल करण्यात आला नाही आणी चांहादे याची बदली करण्यात आली. तेव्हा प्रिया झाबंरे यांनी माहीती चा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत चौकशी अहवाल मागीतला तेव्हा असे दिसुन आले की सहायक पोलीस निरीक्षक नागलोत पो.स्टे घुघ्घुस यानी गैर अर्जदार सहायक पोलीस निरीक्षक चांहादे याचा बचाब करण्याकरीता वरिष्ठांना खोटा अहवाल पाठविला. चौकशी दरम्यान अर्जदार प्रिया झाबंरे यांनी नागलोत यांना पुर्ण बयान दिला. चांहादे यांनी अंगावरील ओढणी काढायला लावली याची रेकार्डींग असल्याचे, सांगुन सुद्धा अर्जदार प्रिया झाबंरे यांचे ऐकुन घेतले नाही आणी नागलोत आपले कलीग मित्र डिपार्टमेंट वाल्याची बाजु घेऊन, वरिष्ठांची दिशा भुल करुन खोटा चौकशी अहवाल पाठविला. आणी चाहांदे चा बचाव करण्यासाठी अर्जदाराची तक्रार दफ्तरी काढण्याची विनंती केली . पुरावा पडताळणी न करता नागलोत नी एकाच बाजुने तपास केला. महीला सोबत गैरव्यवहार करुन अपमानीत करणार्या सहायक पोलीस निरीक्षक चांहादे वर गुन्हा दाखल न करता नागलोत च्या खोट्या अहवालामुळे अर्जदाराच्या अर्जाकडे दुर्लक्ष केले व आपले कर्तव्य प्रामाणिक पणे न बजावता. नाण्याची एकच बाजु वरिष्ठांना दाखविण्याचे काम नागलोत यांनी केले. चांहादे चा बचाव करण्यासाठी चौकशी मध्ये नागलोत ला हडबडी झाली. त्यामुळे बोरकर या नावाने गुन्हा दाखल की नाही हे सुद्धा विसरले यांचेवरुन दिसुन येते की पोलीस प्रशासन किती काळजीपुर्वक कर्तव्य पार पाडतात. आणी वरिष्ठ सुद्धा सहानिशा न करता एकतरफ़ा निर्णय घेतात व डिपार्टमेंट च्या व्यक्तीचा बचाव करुन जनतेच्या समोर पोलिसांची सत्यता येण्यापुर्वीच चांहादे सारख्यांना शिक्षा करण्या ऐवजी त्यांची बदली करुन बचाव करतात. पंरतु आज दिनांक २६/११/२०२० ला संविधान दिवस या दिवशी संविधानाचा गैरवापर करणार्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नागलोत याची घुघ्घुस पोलिस स्टेशन ला लेखी तक्रार देण्यात आली आहे. तसेच २५/११/२०२० ला उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रपुर यांना सुद्धा लेखी तक्रार देण्यात आली. घुघ्घुस पोलीस निरीक्षक आणी वरिष्ठांनी गैर अर्जदार सहायक पोलीस निरीक्षक चांहादे आणी नागलोत वर कारवाई न केल्यास. प्रिया झाबंरे ह्या आमरण उपोषण करणार आणी माननीय कोर्ट विद्यमान यांना गुन्हा दाखल करण्याकरीता विनंती अर्ज करणार . चांहादे नी दिलेली वागनुक चे प्रिया झाबंरे कडे संपुर्ण पुरावे आहेत. नागलोत ला दिलेला बयानाचे सुद्धा व्हिडीओ असल्याचे प्रिया झाबंरे यांनी सांगीतले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here