राजुरा..
आम आदमी पक्षाचे वतीने विविध प्रकारच्या मागण्या घेऊन ,केले बोंबाबोंब आंदोलन
चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी झालेला पाऊस ,बोगस बियाणे सोयाबीनची मोड , अशा अनेक मागण्या घेऊन आम आदमी पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले.राजुरा पंचायत समिती संविधान चौकात ,आम आदमी पार्टी राजुरा तालुकातील कार्यकर्ते एकत्र येऊन भजन ,गायन करून शेतकरी बांधवांच्या विविध मागण्या घेऊन बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.कोरोनाच्या काळातील वीज बिल माफ करावे,अतिवृष्टी कापूस,सोयाबीन धान पिकाचे झालेले नुकसान भरपाई म्हणून एकरी 30 हजार रुपये भरपाई देण्यात यावी, सोयाबीन बोगस बियाने पेरणी केल्यावर उगवलेच नाही ,त्यामुळे दुबार पेरनी करावी लागली अशा शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी ,अशा प्रकारे विविध प्रकारच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले होते.
प्रतिकार न्युज