राजुरा…
राजुरा शहराची ओळख फार जुनी आहे ,या राजुरा शहरातून राजुरा मुक्ती संग्राम लढा उभारला होता.
राजुरा ताल्याक्यातील नलफडी येथील धोटे कुटुंबातील लोकांनी जीवाची बाजी लावून इंग्रजांना पळवून लावले होते,मराठवाडा मुक्ती संग्राम लढा ,आज 17 सप्टेंबरला राजुरा ,मराठवाडा विभागातील नागरिक दरवर्षी आपला उत्सव साजरा करीत असतात ,परंतु काही वर्षपासून राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे सुरू झाले,या अवैद्य धंद्यामुळे ग्रामीण भागातील तरुण पिढीला धोका वाढला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे,कोरोनाच्या काळात शाळा ,कालेज बंद असल्याने,सोबतच कामधंदे नसल्याने तरुण वर्ग काही प्रमाणात वाईट व्यसनाला लागला असल्याने पालकांसमोर मोठी गँभिर समस्या निर्माण झाली असल्याने ,पालक वर्ग चिंतेत आहे,शेतकरी बांधवांचे शेतीचे उत्पन्न खर्चही निघत नाही ,गावा गावात अवैद्य दारूचा पुरवठा ,त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने परस्थिती गँभिर होत आहे,महसूल विभागातील रेती तस्कर दिवसा साव रात्री चोर अशी तस्कराची सुरवर झाली आहे,सर्वत्र तालुकाभर मिळेल त्या ठिकाणावरून रेती तस्करी सुरू आहे ,महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले मुख्यालय केव्हांचेच सोडल्याने,चोराला आयटी संधी मिळत आहे.रेती चोरांना आळा बसावा म्हणून नियंत्रण यंत्रणा तयार केली परंतु तालुक्याचा जो अधिकारी आहे बीडीओ त्याच अधिकाऱ्याकडून चोरीची रेती वापरून ग्रामीण भागात पंचायत समितीचे कामे सुरू आहेत ,अशा पद्धतीने शासकीय मालमत्तेची लूट सुरू आहे,आणि महसूल विभाग ,हा सर्व प्रकार आंधळ्या डोळ्यांनी पाहत आहे,या प्रकारामुळेच राजुरा शहराचं नाव अवैध धंद्याने पुढे आले,नुकताच कोंबड बाजार सुरू झाल्याने ,त्या ठिकाणी गर्दी,पाहण्यास मिळत आहे,मागील काही वर्षांपासून ग्रामीण भागातील तरुण रोजगारासाठी वणवण फिरत आहे,ज्याच्या जमिनी वेकोली त गेल्या आशा अनेक लोकांना अजूनही रोजगार मिळाला नाही .कित्येक बेरोजगारांचे वय 40 ,45वर्ष होऊन गेलेत,अशी या बेरोजगारांची थट्टा होत आहे,बाजार पूर्ण आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे,फक्त पण मटेरिअल,काही किराणा आणि डॉक्टर ,मेडिकल सोडले तर बाकी ठिकाणी ठणठण गोपाल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोनाच्या काळात डॉक्टर, मेडिकल मध्ये रुगणाची झालेली आर्थिक लूट नागरिकांना समजलीच नाही आपण कसे लुटल्या गेलो नंतर समजले,
प्रतिकार न्युज