Home राजकारण उठ ओबीसी जागा हो नागपूर पदवीधर मतदार संघाचा राजा हो*

उठ ओबीसी जागा हो नागपूर पदवीधर मतदार संघाचा राजा हो*

53
0

राजुरा…

उठ ओबीसी जागा हो नागपूर पदवीधर मतदार संघाचा राजा हो*

नागपुर पदवीधर मतदार संघाची निवडणूक 1 डिसेंबर 2020 ला संपन्न होणार आहे .ही निवडणूक अभिजीत वंजारी विरूध संदीप जोशी अशी रंगणार आहे . या निवडणुकीत जोशी विरुद्ध ओबीसी असा सामना होण्याची चिन्ह दिसत आहे .
नागपुर पदवीधर मतदार संघाचा निवडणुकीचा इतिहास बघता आपल्या लक्ष्यात येईल की मागील 50 वर्षा पासून या मतदार संघावर एका विशिष्ठ प्रवर्गाची मक्तदारी दिसून येत आहे .गंगाधर फडणवीस , बच्छराज व्यास ,नितिन गडकरी , अनिल सोले यांनी या पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व केले .आता त्याच प्रवर्गाचे संदीप जोशी उभे आहेत .यावरून आपल्या लक्ष्यात येईल की एकाच प्रवर्गातिल उमेदवारला संधी दिली जात आहे .
नागपुर पदवीधर मतदार संघात *नागपुर ,वर्धा ,चंद्रपुर ,गडचिरोली,गोंदिया* व भंडारा या 6 जिल्ह्यांचा समावेश असून हा *ओबीसी बहुल मतदार संघ असून देखील ओबीसी उमेदवारांना डावलण्यात आले आहे .
ही लढत जोशी विरुद्ध वंजारी अशी होणार असून बहुजनाच्या अस्तित्वाची ठरणार आहे .म्हणूनच बहुजनांच्या संघटना वंजारी यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या आहेत .ही लढाई 3% विरुद्ध 85 % अशी होणार आहे .
संदीप जोशी हे नागपुरचे महापौर आहेत .कोरोंनाच्या काळात चांगलं काम करणार्‍या व नागपुर महापालिका भ्रष्टचार मुक्त करणारेब *ओबीसी अधिकारी तुकाराम मुंढे* यांना त्रास देणारे एवढच नव्हे तर आपल्या स्वार्थासाठी त्यांची बदली करणारे जोशी यांना नागपूरकर व ओबीसी जनता नक्कीच धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही .एक चांगला कर्तव्यदक्ष ,कार्यक्षम अधिकारी कोरोंना संकटात दूर गेल्याची नाराजी आजही जनतेत आहे याची जबर किंमत जोशी यांना सहन करावी लागणार आहे .
ओबीसी उमेदवार निवडून येऊ नयेत म्हणून विरोधकांनी “फोडा आणि राज्य करा “ या नीतीचा अवलंब करून बहुजन समाजातील अनेक उमेदवार मैदानात उतरविले आहेत .याचा फटका ओबीसीना बसत आहे पण आता बहुजन मतदार आपल्या मतांचे विभाजन होऊ देणार नही . जिंकण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे अभिजीत वंजारी असल्याने बहुजन समाज त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे .त्यांना पसंती क्रमांक 1 देऊन त्यांना विजयी करणार आहेत .या वर्षी *बहुजन समाज इतिहास घडविण्याच्या तयारीत असून तो इतिहास घडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.अभिजित वंजारी यांच्या निमित्तानं ओबीसी नागपूर पदवीधर मतदार संघात आपलं खातं उघडल्याशिवाय राहणार नाही. *उठ बहुजनजागा हो नागपूर पदवीधर मतदार संघाचा राजा हो*

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here