Home विशेष *☸️ संविधानाचे संवरक्षण करणे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे. :- भदंत एस....

*☸️ संविधानाचे संवरक्षण करणे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे. :- भदंत एस. प्रज्ञाबोधी ( महाथेरो ) ☸️* =-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=

4
0

प्रतिकार

*विश्वशांती बुद्ध विहार, बुद्धभूमी मावसाळा ता. खुलताबाद जि.औरंगाबाद येथे ” अखिल भारतीय बौद्धधम्म ज्ञानसागर प्रसारक मंडळ ” या संस्थेद्वारे सन 2001 पासून ” संविधान दिन ” साजरा करण्यात येतो दरवर्षाप्रमाणे याहीवर्षी ऐतिहासिक पवित्र अशा ” बुद्धभूमी मावसाळा येथील विश्वशांती बुद्ध विहारामध्ये ” नुकताच आज दिनांक 26 नोव्हेंबर 2020 गुरुवार रोजी भदंत एस. प्रज्ञाबोधी ( महाथेरो ) यांच्या अध्यक्षतेखाली ” संविधान दिन ” मोठ्या हर्षाने साजरा करण्यात आला या वेळी भदंत करुणाबोधी, भदन्त सागरबोधी ( व्यवस्थापक ), आयु. आर. टी. लोणकर साहेब , आयु.रामनाथ वरकड ( सामाजिक कार्यकर्ते ), आयु.प्रा. देवानंद पवार ( कवी तथा समीक्षक ) आदी मान्यवर उपस्थित होते*
*सुरुवातीला महाकारूणी तथागत भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून धूप, दीपाने पूजन करून उपस्थितांना भदंत एस. प्रज्ञाबोधी ( महाथेरो ) यांनी त्रिशरण पंचशील प्रदान केले त्यानंतर भिक्षूं संघांचे आणि पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले तदनंतर ” संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन ” करण्यात आले यावेळी पाहुण्यांचे भाषणे झाली त्या नंतर भदंत एस. प्रज्ञाबोधी ( महाथेरो ) हे अध्यक्षस्थाना वरून बोलताना म्हणाले की या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे, पंथाचे, रीतीरिवाजाचे, वेगवेगळ्या वेशभूषा, बोलीभाष्या चे वेगवेगळ्या प्रांताचे लोक स्वतंत्र राहतात ते केवळ संविधानामुळे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ” संविधान ” लिहून या भारत देशाला बहाल केले या घटनेला आज ” परिपूर्ण ७१ वर्ष पूर्ण ” होत आहे म्हणून ” संविधानाचे संवरक्षण करणे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे ” असे कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत एस. प्रज्ञाबोधी ( महाथेरो ) यांनी प्रतिपादन केले*
*कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनोद तर आभार सुभाष वाकेकर यांनी केले*.
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here