Home राष्ट्रीय *भारतीय संविधान दिन* *भारताचा राष्ट्रीय विधि दिन*

*भारतीय संविधान दिन* *भारताचा राष्ट्रीय विधि दिन*

60
0

चंद्रपूर…

भारतीय संविधान दिन*
*भारताचा राष्ट्रीय विधि दिन*

संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.
२९ ऑगस्ट, १९४७ रोजी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा  २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.
भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर, २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.
संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस *’संविधान दिन’* म्हणून साजरा केला जातो.[
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर, २००८ ला आदेश काढून *’२६ नोव्हेंबर’* हा दिवस *संविधान दिन* म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

*२६ नोव्हेंबर-संविधान दिवस*

४ नोव्हेंबर, १९४८ ला संविधानाचा मसुदा संविधान सभेत प्रस्तुत केल्यानंतर त्यावर संक्षिप्त चर्चा करण्यात आली होती. या चर्चेला संविधानाचे प्रथम वाचन म्हणून संबोधण्यात आले.
संविधानाच्या दुसऱ्या वाचनास १५ नोव्हेंबर, १९४८ रोजी प्रारंभ झाला. दुसऱ्या वाचनात प्रत्येक अनुच्छेदावर क्रमवार सविस्तर चर्चा झाली.
त्यानंतर तृतीय वाचनाकरिता १४ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधान सभा पुन्हा भरली. हे सत्र २६ नोव्हेंबर, १९४९ ला संपले. त्यानंतर “संविधान स्वीकृत झाले”, असे घोषित करण्यात आले व त्यावर संविधानसभेच्या अध्यक्षांनी स्वाक्षरी केली.
संविधान सभेचे अध्यक्ष *डॉ. राजेंद्र प्रसाद* यांचे समारोपाचे भाषण होऊन त्याचदिवशी भारताचे संविधान संमत झाले.
त्याअनुषंगाने समस्त भारतीयांनी *२६ नोव्हेंबर-संविधान दिवस* हा दिवस “राष्ट्रीय सण” म्हणून साजरा करावा आणि राष्ट्रीय ऐक्य अबाधित ठेवावे.
📙📘📗

*२६ नोव्हेंबर-संविधान दिनानिमित्त भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!*

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here