Home Breaking News प्राधान्य कुटुंब योजनेतील तांदूळ खुल्या बाजारात शहरात मोठ्या प्रमाणात तांदूळ विक्री ?

प्राधान्य कुटुंब योजनेतील तांदूळ खुल्या बाजारात शहरात मोठ्या प्रमाणात तांदूळ विक्री ?

74
0

राजुरा

चोरीचा मांमला हळुहळु बोंबला।

अन्न पुरवठा अधिकाऱ्याची चौकशो करा

स्वतःची पापे लपविण्यासाठी मोजक्या पत्रकारांना पाकिटे दिली!

राजुरा तहसिल कार्यालयात अन्य धान्य पुरवठा अधिकाऱ्याने काही निवडक पत्रकारांना दिलेल्या दोनहजाराच्या पाकिटाचे प्रकरणाने पेट घेतल असून या प्रकरणाची जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.तहसील कार्यालयातील हा अन्नपुरवठा विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारनामुळे चर्चेत राहिले आहे.या विभागातील अधिकारी यांचे नागरिकासोबत उर्मटपणे वागतात आशा अनेक तक्रारी आहेत.राजुरा याठिकाणी काही मंगलकार्यालयात घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करीत असल्याचे दिसून येत आहे.शहरात खाद्य पदार्थ विक्री बाबत भेसळ विक्री होत असतानाही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.आरोग्याशी खेळ सुरू झाला आहे की काय, नागरिकांना समजत नाही ,दिवाळी नंतर पुन्हा आरोग्य बिघडले असल्याने दवाखाणे फुल्ल भरलेले दिसत आहे.आपले बिंग फुटू नये म्हणून काही पत्रकारांना हाताशी धरून आपण केलेल्या कामाची डिंग मारली त्या बाबत आपला भ्रष्ट्राचार लपविण्याचा प्रकार आहे.स्वतःची पापे लपविण्यासाठी काही लोकांना पाकिटे दिली आहे पण त्याच पाकिटाने या आधीकाऱ्याचा खोटारडा उघडकीस आला आणि सुटी घेऊन गावाला पोबारा केला.
पत्रकारांना दिवाळी चे लिफापे द्यावे लागते ,म्हणून लाखो रुपये दुकानदारकडून वसूल केल्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे. कारण पत्रकार सुद्धा जाहिरातीसाठी सर्वाना विचारपूस करीत होते तेव्हा हा प्रकार उघडकीस आला ,अनेक दुकानदारांनी पत्रकाराजवळ सांगितले ,त्यामुळे या अधिकाऱ्याचे पाप उघडे पडले असा अधिकारी म्हणून प्रथमच अनुभव आला .या अधिकाऱयांची तक्रारही होत आहे.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here