राजुरा…
* 26 नोव्हेंबरला कामगारांचा राष्ट्रव्यापी संप
* राजुरा तालुक्यात जोरदार तयारी
दिनांक 26 नोव्हेंबर ला देशातील अकरा राष्ट्रीय कामगार संघटना व फेडरेशन आणि राज्य व केंद्र स्तरावरील कर्मचारी संघटना यांनी पुकारलेल्या बंदची जोरदार तयारी करण्यात आली आहे. राजुरा तालुक्यातील सर्व कोळसा खाणीत कामगार संघटनांनी सर्वत्र गेट मीटिंग घेऊन जनजागृती केली आहे. हा संप शंभर टक्के यशस्वी होईल,असा आशावाद आयटक, इंटक, एचएमएस व सिटू या कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कामगार कायद्यातील परिवर्तन रद्द करावे, खाजगीकरण करणे बंद करावे, संघटीत सोबतच असंघटित कामगारांना सर्व सोई व नियमानुसार वेतन द्यावे यासह प्रमुख अकरा मागण्यांसाठी हे देशव्यापी आंदोलन होत आहे.
या संपात भारतीय मजदूर संघ ही संघटना सहभागी नाही. तरीपण कामगार हित लक्षात घेता सर्व कामगारांनी हा संप यशस्वी करावा,असे आवाहन दिलीप कनकूलवार, रायलेंगु झुपाका, अशोक चीवंडे, विजय कानकाटे यांचे सह कामगार संघटनेच्या अनेक नेत्यांनी केले आहे.
प्रतिकार न्युज