

विद्यमान सरकार आत्मनिर्भरतेचा नारा देत गाभ्याच्या उद्योगाचे खासगीकरण करू पाहत आहे. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे देखील खासगीकरण संभवते आणि तशा आशयाच्या बातम्या सध्या माध्यमाद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारीत करण्यात येत आहेत. एकीकडे खासगी क्षेत्रातील बँका येस बँक, लक्ष्मी विलास बँक चुकीच्या मोठ्या उद्योगाला वाटलेल्या कर्ज वाटपामुळे अडचणीत येत आहेत, तर दुसरीकडे सरकार सुस्थितीत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करून सामान्यजनांच्या ठेवी धोक्यात आणू पाहत आहे. एकीकडे सरकार आत्मनिर्भरतेचा नारा देत आहे आणि दुसरीकडे भारतीय खासगी बँक लक्ष्मी विलास बँक विदेशी डीबीएस बँकेच्या भारतीय कंपनीच्या दावणीला बांधू पाहत आहे, असा आरोप महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी केला.