राजुरा…
नोंदणी केलेल्या शेतकर्यांनी सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावा – सभापती कवडू पोटे
राजुरा, 24 नोव्हेंबर-
राजुरा आणि कोरपणा तालुक्यातील शेतकर्यांनी राजुरा कृषी बाजार समितीत नोंदणी करून आपल्या क्रमांकाची वाट न पाहता राजुरा तालुक्यातील सीसीआयच्या तीन खरेदी केंद्रावर आपला कापूस विक्रीसाठी आणावा, अशी विनंती वजा सुचना राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कवडू पोटे यांनी केली आहे.
राजुरा तालुक्यात किसान जिनिंग अँड प्रेसिंग कंपनी तुलाना, गणेश कोटेक्श खामोना आणि वैभव कोटेक्श पांढरपोवनी या तीन ठिकाणी सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहे. शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात राजुरा बाजार समितीत नोंदणी केली आहे. मात्र आता शेतकर्यांना आपला अणुक्रमांक येण्याची वाट पाहण्याची गरज नाही. त्यांचा कापूस तातडीने घेण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आधारभूत किमतीत आपला कापूस विक्री करण्यासाठी कोणत्याही खाजगी व्यापाऱ्याकडे न नेता वरील तिन्ही जिनिंग मध्ये विक्रीसाठी न्यावा, असे आवाहन राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कवडू पाटील पोटे यांनी केले आहे.
प्रतिकार न्युज