Home क्राइम *अर्थ मायेच्या लाभातून, अवैध धंद्यांना अभय* प्रशासनाच्या आशिर्वादाने अवैध धंद्यांना ऊत...

*अर्थ मायेच्या लाभातून, अवैध धंद्यांना अभय* प्रशासनाच्या आशिर्वादाने अवैध धंद्यांना ऊत ?

4
0

ëLराजुरा…

*अर्थ मायेच्या लाभातून, अवैध धंद्यांना अभय*
*पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने अवैध धंद्यांना ऊत ?

राजुरा : शांतताप्रिय व गुन्हेगारी पार्श्वभुमी नसलेले शहर म्हणून राजुरा शहर जिल्ह्यात परिचित आहे.  शेतकरी बांधवांचा हंगाम आणि हातात आलेले चार पैसे काही च्या हातात आल्याबरोबर कोंबड बाजार सुरुवात झाली !मागील काही महिण्यापासून राजुरा शहराला अवैध धंद्यांचे ग्रहणच लागल्याचे दिसून येते. शहरालगत असणारे रामपूर, सास्ती व कापनगांव येथे मोठ्याप्रमाणात कोंबडा बाजार, शहरातील सर्वच भागात दारूविक्री, सुगंधीत तबांकू व अवैध साहित्यांची विक्री सुरू आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरू असून याची सर्व कल्पना पोलीस प्रशासनाला असल्याचे बोलले जाते. परंतू पोलीस विभागातील गुन्हे अन्वेषन विभागातील काही मुरब्बी पोलीसांकडून अर्थ मायेच्या लाभातून या सर्व अवैध प्रकाराला हिरवा कंदिला दिला असल्याचे सर्व चर्चील्या जात आहे. यामुळे शहरात अवैध धंद्यांना ऊत आले आहे.
शहरालगत कापनगांव, रामपूर व सास्ती येथील शेत शिवारात मोठ्याप्रमाणात कोंबडबाजार भरवला जात आहे. रवीवार, बुधवार व शुक्रवार यादिवशी तर जणू जत्रेचे स्वरूपच कोंबडबाजाराला येते. हा प्रकार खुलेआम सुरू असून याकडे पोलीस प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केले आहे. शहरातील गडचांदूर रोड व आसिफाबाद रोड याठिकाणी मोठ्या किराना दुकाणातून सुगंधीत तंबाकूची सर्रास विक्री सुरू आहे. मध्यरात्रोच्या वेळी मोठ्या वाहनाने या तंबाकूची वाहतूक केली जात असून काही दिवसापूर्वी दुचाकीने एका पानठेल्यावर सुगंधीत तंबाकू पोहविण्यासाठी गेलेल्या एका मोठ्या व्यवसायीकांचा नोकराला सोमनाथपूर परिसरात गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका नामांकित पोलीसांनी पकडले. परंतू हप्ता बोलणी व जागीच सोडण्यासाठीचे विशेष धनलाभ मिळवून त्या नोकराला जागीच सोडण्यात आले होते. तसेच घडल्या प्रकाराची कानोकान खबर होणार नाही, अशी सुचना ही पोलीस कर्मचाऱ्यानी त्या नोकर व त्याच्या मालकाला दिली. पण घडला प्रकार अनेकांनी बघीतल्याने चर्चेला मोठे पेव फुटले होते.
तालुका सिमेला लागून तेलंगना राज्याची सिमा असून दिवस रात्र दारूची वाहतूक होत आहे. शहरातील प्रत्येक गल्लीत दारू विक्रेते तयार झाले असून मोठ्याप्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू आहे. या अवैध विक्रीची पुर्ण कल्पना पोलीस कर्मचाऱ्यांपासून तर स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना आहे. परंतू विविध कार्यक्रम व पार्टी आयोजनासाठी याच विक्रेत्यांची तन-मन-धनाने मदत घेतली जात असल्याने गुन्हे अन्वेषन शाखेतील कर्मचाऱ्यांचा या विक्रेत्यांवर वरदहस्त असल्याचे चर्चील्या जात आहे. मुख्यालयाकडून अवैध दारूविरोधी मोहीम राबविण्याचा फतवा आल्यास थातूरमातूर कार्यवाही केली जाते. यात डी.बी. तील “त्या” पोलीस कर्मचाऱ्याकडे ऐंट्री नसणाऱ्यांना पकडून कारवाई करून वरीष्ठांकडून पाठ थोपटवून घेतली जात असल्याचे खुद्द काही इमानदार पोलीस कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. या सर्व प्रकारात गुन्हेशाखेतील चंद्रपूर येथून ये-जा करणाऱ्या एका पोलीस हवालदाराची भूमीका महत्वाची असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना याच हवालदाराकडून अभय मिळत असल्याची शहरात व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. शहरात चालणाऱ्या अवैध व्यवसायावर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लक्ष वेधून विशेष मोहिम राबविण्याची व गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी शहरवासीय करत आहे.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here