राजुरा.
भाजपाचे वीज बिल जाळून आंदोलन
सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने निषेध – अँड. संजय धोटे
राज्य शासनाने लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल बिलात सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु राज्य सरकारने आपला शब्द फिरविला असून आता वीजबिल माफ करणार नसल्याचे वीज मंत्र्यानी सांगितले आहे. हा येथील जनतेचा अपमान असून तातडीने वीज बिल माफ करावे आणि शेतकर्यांच्या सर्व समस्या सोडवाव्यात, या मागणीसाठी राजुरा तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे तहसील कार्यालयापुढे वीज बिलाची होळी करण्यात येऊन आंदोलन करण्यात आले. पंचायत समिती चौकातून निघून भाजप कार्यकर्ते तहसील कार्यालयापुढे मोर्चाद्वारे आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या.
मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार अँड. संजय धोटे,सुदर्शन निमकर,भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,जी.प. सभापती सुनील उरकुडे, अरुण मस्की, सतीश धोटे, विनायक देशमुख, मधुकर नरड,भाऊराव चंदनखेडे, संजय उपगन्लावर, प्रशांत घरोटे. दिलीप वांढरे, हरिदास झाडे,धनवलकर, सचिन शेंडे, सचिन डोहे, कृष्णा संभोज, मिलिंद देशकर यांनी केले.
लॉकडाऊनच्या काळातील वीजबिलात सूट देऊ,असे आश्वासन दिले असताना सरकार आपला शब्द फिरवून नागरिकांवर अन्याय करीत असल्याबद्दल माजी आमदार अँड.संजय धोटे व देवराव भोंगळे यांनी यावेळी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्याचे ज्वलंत प्रश्न सोडवित नसल्याबद्दल तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यानंतर वीज बिलांची होळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिकार न्युज