Home राज्य वनिकरण भरगच्च कार्यक्रम कोटीचा निधि खर्च? वुक्ष लापता मजुरांचे शोषण ...

वनिकरण भरगच्च कार्यक्रम कोटीचा निधि खर्च? वुक्ष लापता मजुरांचे शोषण …..

13
0

कोरपना…
प्रमोद गिरटकर..द्वारा

वनिकरण भरगच्च कार्यक्रम कोटीचा निधि खर्च वुक्ष लापता मजुरांचे शोषण ?

कोरपना प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वनविभागाकडून वेगवेगळ्या स्त्रोतातुन नैसर्गिक निर्मित रोपण महाराष्ट्र ग्रामीण रोजगार कार्यक्रम वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम मॅप अंतर्गत वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात आला होता शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी या कामावर खर्च घालण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून कोरपना तालुक्यातील वनसडी परिक्षेत्र अंतर्गत शेकडो हेक्टर जमीन क्षेत्रात कार्यक्रम राबवून पाण्यासारखा पैसा खर्ची घातला मात्र म्याप अंतर्गत कक्ष क्रमांक 194 कवठाळा मिश्र रोपवन जैतापूर कक्ष क्रमांक 199 हेक्टर 55 इतर क्षेत्रात 150 हेक्टर एकूण दोनशे पाच हेक्टर करिता तीन वर्ष खर्चाच्या तुलनेत शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी दिला अंदाजपत्रकाच्या दराप्रमाणे मजूरांना दर दिले गेले नाही मंजूर मापानुसार झाडाची लागवड झाली नाही नींदन करणे रासायनिक खताचा वापर करणे अंदाजपत्रकानुसार ही कामे करण्यात आली नाही मात्र बोगस बिले जोडून निधी खर्च घालण्यात आला एएन आर योजनेअंतर्गत कामात अनेक उणिवा आहेत स्थानिक मजुरांना काम न देता बाहेरच्या मजुरांना काम देण्यात आले व स्थानिक मजुरांना अल्प दर देऊन त्यांची पिळवणूक केल्या गेली गेल्या पाच वर्षात वनपरिक्षेत्र अंतर्गत अनेक गावांमध्ये रोपणाचे काम करण्यात आली नांरडा वनोजा या भागात दगडी कंपार्टमेंट कामावर लाखोचा निधी खर्च करीत त्या ठिकाणी मिश्र रोपांची लागवड करण्यात आली होती परंतु मरगळ पुनर्लागवड या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सुद्धा रोपेजगविल्या जात नसेल कोट्यावधी रुपयाचा खर्च करून वाजागाजा केल्या जात असेल तर याचा नागरिकांना फायदा काय संपूर्ण रोपवन लागवड कामाची चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई करा अशी मागणी वन मंत्री संजय राठोड विभागीय वनसंरक्षक यांना राष्ट्रवादी कॉग्रेसचे स आबिद अली यांनी पाठविलेल्या निवेदना तुन केली आहे.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here