Home राजकारण एक व्यक्ती लॉकडाऊननंतर दाढी करायला गेला असता तो दुकानदाराने लावलेला बोर्ड वाचतो…

एक व्यक्ती लॉकडाऊननंतर दाढी करायला गेला असता तो दुकानदाराने लावलेला बोर्ड वाचतो…

56
0

राजुरा..

आज राज्यात ठीक ठिकाणी विजबिला विरोधात विज बिलची होली करण्यात आली होती. मार्च पासून कामधंदे बंद, दुकान बंद,त्यामुळे स्वताच दोन वेळच भोजन कस करायचं चिंता होती.वीज महावितरण कम्पणीने तीन महिने ,स्थिर आकार रद्द केल्याचे सांगितले ,आणि वीजबिल कमी पाठविले नंतर विजवीतरण कम्पणीने स्थिर आकार जोडून वीजबिल पाठविणे सुरू केले,त्यामुळे जनतेत प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आणि 23 नोव्हेम्बरला राज्यात वीजबिल होळी करण्यात आली .
विजबिल्लात आपली कशी फसवणूक करतात त्या बिलाची नक्कल एका सलून दुकानात बोर्ड लावून जनतेचे लक्ष वेधले आहे.आता यापुढे वाढीव वीजबिल भरुच नये यासाठी आंदोलन सुरू झालेत, आता खरी लढाई वीजबिल ग्राहकाची आहे.

वीजबिल कसे तयार होते ते पाहा।।।।

एक व्यक्ती लॉकडाऊननंतर दाढी करायला गेला असता तो दुकानदाराने लावलेला बोर्ड वाचतो…

दाढी – फक्त १०₹
ब्लेड अधिभार – २₹
वस्तरा भाडे – ५ ₹
क्रिम – ५ ₹
कात्री भाडे – ५ ₹
खुर्ची भाडे – ५₹
लोशन – ५₹
पावडर – ५ ₹
नॅपकिन भाडे – ५₹
एकूण रु. – ४७ ₹
बोर्ड वाचून ग्राहकाने विचारले : तुम्हीतर कमाल केली, दाढी फक्त १० ₹ लिहून इतर छुपे खर्च लावून ग्राहकांची लूट करता?
दुकानदार : हा बोर्ड तरी मोठ्या अक्षरात आणि शुद्ध मराठीत असल्याने तुम्हाला वाचता येतो! तरीही तुम्ही मला जाब विचारला? परंतु, महावितरणकडून अनेक वर्षांपासून महाफसवणूक सुरू आहे! त्यांचे बिल किती जणांना कळते?

ग्राहकांनी भरलेली अनामत रक्कम ,आणि आजपर्यन्त आपण महावितरण कम्पणीला दिलेला पैसा याचा हिशोब काढला तर आपलेच पैसे निघतील,अशी अवस्था बिकट करून ठेवली या महावितरण व्यवस्थेने,

महावितरण कम्पणीने वाढीव वीज दराने वीज बिल पाठवून , दिवाळीत ग्राहकाचे फटाके फोडले,

विजवीतरण कम्पनी म्हणतो वीज वापरली वीज बिल भरावीच लागेल ,आधी कशाला सांगितलं वीज माफ होणार म्हणून आणि आता दिलेला शब्द फिरवायचा ?
एकंदरीत फटका बसतो तो शेतकरी ,शेतमजुरांनाच ? आता राजकीय लढाईत कोण बाजी मारेल तो पर्यंत जनता मात्र चिंताग्रस्तच !सरकारनी मात्र आता जास्त ग्राहकाचां अंत पाहू नये ,यो काही निर्णय घ्यायचा असेल तो तात्काळ घेऊन जनतेला दिलासा द्यावा अशी जनतेत चर्चा सुरू आहे.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here