राजुरा…..
* शेतकर्यांनी सीसीआय केंद्रात कापूस विक्रीसाठी आणावा
* सभापती कवडू जी पोटे यांचे आवाहन
* राजुरा बाजार समिती येथे कापूस खरेदी सुरु
या वर्षी परतीच्या पावसाने आणि बोंडअळी च्या प्रादुर्भावाने शेतकर्यांच्या कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शेतकर्यांना त्यांच्या कापसाला शासनाने ठरविलेल्या कापसाची आधारभूत किंमत मिळणे गरजेचे आहे.आता राजुरा तालुक्यात दोन ठिकाणी सीसीआयची खरेदी सुरू होत असून शेतकर्यांनी रीतसर डिजिटल नोंदणी बाजार समितीत करून आपला कापूस या केंद्रात विक्रीसाठी आणावा,असे आवाहन राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कवडू पाटील पोटे यांनी केले.
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तुलाना येथील किसान जिनिंग अँड प्रेसिंग आणि
खामोना येथील गणेश कोटेक्स येथे दिनांक 19 नोव्हेंबर पासून सीसीआय कापूस खरेदी शुभारंभ करताना कवडु पाटील बोलत होते. पूर्वी एका सातबारावर चाळीस क्विंटल कापूस खरेदी होत होती परंतु आता पंधरा दिवसाच्या फरकाने पुन्हा चाळीस क्विंटल कापसाची खरेदी होणार आहे. आवश्यकता भासल्यास किंवा काही समस्या निर्माण झाल्यास आपल्याशी संपर्क साधावा,असेही त्यांनी सांगितले.
या शुभारंभ कार्यक्रमात कापूस विक्रीसाठी पहिली गाडी चंदनवाही येथील सुनंदा जीवतोडे व गोवरी येथील हरीचंद्र जुनघरी या शेतकऱ्यांची लागली. या दोन्ही शेतकर्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कवडुजी पोटे, उपसभापती नारायण गड्डमवार, संचालक नानाजी पोटे, बरडे, सचिव मंगला मेश्राम, सीसीआय ग्रेड प्रमुख दिलीप कांबळे, जिनिंग मालक राधेश्याम अडानिया, मनमोहन सारडा यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
प्रतिकार न्यूज़