Home आपला जिल्हा खडकी- रायपुर येथील आदिवासी कोलाम बांधवांसोबत वाढदिवस साजरा…

खडकी- रायपुर येथील आदिवासी कोलाम बांधवांसोबत वाढदिवस साजरा…

42
0

जीवती…

खडकी- रायपुर येथील आदिवासी कोलाम बांधवांसोबत वाढदिवस साजरा.

महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघ, तालुका राजुरा तर्फे विजयकुमार लांडगे (राज्य अध्यक्ष ,म.म.मा.अ.सं.)
यांच्या वाढदिवसा नीमीत्य धान्य कीट ,कपड़े व खाऊ चे वाटप.

राजुरा 22 नोव्हेंबर
महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघ ,तालुका राजुरा शाखे तर्फे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजयकुमार लांडगे यांच्या वाढदिवसाचे अवचीत्य साधून खडकी -रायपुर तालुका जीवती येथील आदिवासी कोलाम कुटुंबातील सदस्यांना धान्य कीट ,कपड़े व खाऊ चे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्षा रजनी शर्मा , तालुका कार्यवाह पूर्वा देशमुख , उपाध्यक्षा क्रुतीका सोनट्टक्के ,एड़. मेघा धोटे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे चे नागपूर विभाग सचिव बादल बेले , जिल्हा संघटक विजय जांभूळकर ,तालुका अध्यक्ष संतोष देरकर ,शहर अध्यक्ष संदीप आदे , तालुका संघटीका सूनैना तांबेकर ,मनोज तेलीवार , आशीष करमरकर , विकास कोलाम फाऊंडेशन चे अध्यक्ष विकास कुंभारे , पाथ फाऊंडेशन चे एड़. दीपक चटप , सुनीता कुंभारे आदिंचि प्रामुख्याने उपस्थिति होती.
यावेळी रजनी शर्मा यांनी महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघाची कार्यपद्धती यावर प्रकाश टाकत या संघातर्फे अनेक सामाजिक ,शैक्षणिक उपक्रम राबविल्या जात असल्याची माहिती दिली. क्रुतीका सोनट्टक्के व पूर्वा देशमुख यांनी आदिवासी कोलाम बांधवांच्या सोबत आपण राज्य अध्यक्ष विजयकुमार लांडगे यांचा वाढदिवस साजरा करतांना आनंद होत असल्याचे म्हटले तसेच आगामी काळात विध्यार्थीच्या सर्वांगीण विकासात आपल्या संघाची महत्वपूर्ण भूमिका बजावत त्यांची शैक्षणिक प्रगती करण्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा देशमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन क्रुतीका सोनट्टक्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघ शाखा राजुरा तालुका च्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here