,राजुरा….
तुलाणा तलावात बुडालेल्या त्या युवकाचे तिसरे दिवशी मिळाला मृत्यूदेह
राजुरा(प्रतिनिधी)-
राजुरा तालुक्यातील तुलाणा येथील चार युवक 19 नोव्हेबर ला गावालगत च्या तलावात पोहायला गेले असता त्यातील18 वर्षीय सेवन वसंत ठाकरे हा खोल पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली होती ,माहिती मिळताच ग्रामस्थ स्थानिक मासेमारी करणारे आणि विरुर येथील पोलीस घटनास्थळी पोहचून शोध कार्य सुरू केले परंतु शोध लागला नाही दुसरे दिवशी आपात कालीन पथक कडूनही तलावात शोध घेण्यात आला तरीपण अपयश आले होते,आज तिसरे दिवशी स्थानिक लोकांनी परत पाण्यात शोध घेऊ लागले आणि सकाळी सात वाजे दरम्यान त्याच्या मृत्यूदेह शोधून बाहेर काढण्यात आले ,या शोध कार्यात स्थानिक ग्रामस्थ,मासेमारी करणारे आणि विरुर पोलीस स्टेशनचे सफदरखान पठाण,सुनील राऊत ,लक्ष्मीकांत खंडाले यांनी चागलीच मेहनत घेतली,
या घटनेचा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील कारवाई विरुर पोलीस करीत आहेत.
प्रतिकार न्यूज