Home आपला जिल्हा ध्येयवेड्या तरुणांनी महामार्ग वरील बुजविले अपघात ग्रस्त खडे…

ध्येयवेड्या तरुणांनी महामार्ग वरील बुजविले अपघात ग्रस्त खडे…

4
0

कोरपणा….

ध्येयवेड्या तरुणांनी महामार्ग वरील बुजविले अपघात ग्रस्त खडे*

शिला जी धोटे :- कोरपना चंद्रपुर आदिवासी बहुल कोरपना तालुक्यातील लखमापुर आज दिनांक 20नोव्हेंबर 2020 ला राजुरा गोविंदपूर महामार्ग गडचांदूर शहरा लगत जीवघेणे खडे होते, हे खडे काही युवकांनी मिळून हे खडे बुजविले, येत्या काही दिवसापासून हे खडे जीवघेणे बनले त्या मुळे ये जा करणाऱ्या प्रवासीना मोठी कसरत करावी लागत होती , आणि ही कसरत करताना कित्येक लोक या खड्यात पडले, व काही लोकांना आपला जीव पण गमवावा लागला , या ठिकाणी मोठया प्रमाणात रहदारी असते , व मोट मोठया सिमेंट कंपनीत चालणाऱ्या ओव्हर लोड असलेल्या ट्रक या मुळे या रस्त्याचे बारा वाजले आहे , जिल्हातील अत्यंत वर्दळीच्या महामार्गपैकी एक असलेला महामार्ग आहे या रस्त्याची प्रचंड दूर अवस्था झाली आहे या मुळे स्थानिक लोकांना व शेती मध्ये जाणाऱ्या आणि प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे ,रस्त्यात खडे की खंडात रस्ते अशे चित्र दिसत आहे मात्र ,, बांधकाम विभागाला कुंभकारणाची झोप लागली आहे व स्थानिक प्रतिनिधी बांधकाम विभागाला उठवता येत नाही आहे , याची मोठी खंत व्यक करत नाराजगी व्यक्त करीत असताना ,कोरपना तालुक्यातील गडचांदूर मधील ध्येय वेड्या युवकांनी या महामार्ग वरील आपल्या श्रमदानातून खडे बुजविले , या मध्ये हे श्रम दान करताना , अतुल गोरे , मयूर एकरे ,तुकाराम चिकटे,अनिकेत दैवलकर,राजू झाडे , शेख बाबर , झाकीर शेख, उद्देश भोंगळे , यांनी मिळून हे श्रमदानातून खडे बुजविले, पण हे काम बांधकाम विभागाचे आहे येणाऱ्या काळात हा रस्ता नीटनेटका झाला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा या युवकानी केला आणि लवकर तातडीने काम व्हावं या बदल मागणी केली ,

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here