सातारा…
*बौद्ध म्हणणाऱ्यांनी दोन्ही धर्म नासवले*
हे विधान काही लोकांना आश्चर्यकारक वाटेल , काहींना वाईट वाटेल , काहींना यात तथ्य आहे असे वाटेल . पण माझ्या मते हे वाक्य खरे आहे .बौद्धांनी दोन्ही धर्म नासवले .
हिंदूमध्ये असणारा महार समाज ज्याने बौद्ध धम्म स्वीकारला नाही तो काही विशिष्ट प्रसंगी स्वतःला बौद्ध समजतो . मात्र सगळे व्यवहार हिंदू पद्धतीने करतो. या महारांमध्ये खोबरं मिळेल तिकडे चांगभले अशी यांची वृत्ती आहे. हे लोक हिंदूचे सगळे सण, उत्सव मोठया उत्साहात करतात . *डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देखील मोठया उत्साहात करतात.* यातील काही लोक आर.एस.एस, सनातन, विहिंप, ब्रम्हाकुमारी इ. हिंदूच्या संघटनांमध्ये अतिशय हिरीरीने भाग घेतात.यांच्या घरामध्ये डाॅ. बाबासाहेब आणि बुद्धांबरोबर हिंदूचे सगळे देव असतात *लग्नामध्ये हे लोक बौद्ध पद्धतीने लग्न करतात पण पण लग्न झाल्यानंतर अनेक हिंदू मंदिरांना भेटी देतात, गोंधळ घालतात, बकरी, कोंबडे कापतात एकंदरी हिंदू धर्माची नासाडी करतात.* सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा समाज बहिष्कृत आहे याचा अर्थ यानी हिंदू मंदिराच्या सावलीला पण जायचं नाही, नाही तर यांना पाप लागते म्हणजे ते हिंदूचे नियम पाळत नाहीत आणि बौध्द धम्माचे नियम पण नाहीत .
मुलगी बघायला गेल्यावर काही वेळा मुलग्याला बुद्धीष्ट मुलगी हवी असेल तर महार मुलीकडचे आम्ही बौद्ध आहोत असे सांगतात आणि मुलगा कमवता , गडगंज असेल तर कट्टर बौद्ध आहोत हे दाखवतात याच्या उलट मुलग्याचे आहे मुलगा महार असेल आणि मुलगी दिसायला चांगली, सुशील असेल आणि कट्टर बौद्ध असेल तर मुलाकडचे सांगतात की आम्ही बौध्द आहोत . *हा खोटं बोलण्याचा खेळ फक्त चांगल्यासाठी की पैशासाठी हेच कळत नाही.*
कोकणात बौद्ध पध्दतीने आचरण करणारे लोक खूप आहेत आणि काही लोक तर खूपच प्रामाणिक आहेत. मात्र *काही घरांमध्ये सगळं बौद्ध पद्धतीने चाललेलं असते आणि आतल्या कोणत्यातरी खोलीत पूर्वीचे कधीचे देव ठेवलेले असतात.* तेच विदर्भात कोणतीतरी अम्मा घराघरात दिसते. मुंबई, पुणे हे तर *सगळ्यात हरामी मुंबई पुण्यात डाॅ.बाबासाहेबांची चळवळ सांगतात आणि गावाकडे जत्रा यात्रा करण्यात पुढे असतात. गाडया वगैरे घेऊन यात्रेला येतात.* यांना पंचशील त्रिशरण म्हणता येत नाहीत पण सगळ्यां देवांच्या आरत्या यांना तोंडपाठ असतात .
सगळ्यात जास्त वाट पश्चिम महाराष्ट्रात लागलेली आहे . इथे सगळे सधन असल्यामुळे यांना धम्माचे काय घेणं देणं नाही . *एका गावात महारांची ५० कुटुंबे असतील तर दोन किंवा तीन कुटुंबे प्रामाणिकपणे बौद्धपध्दतीने आचरण करणारी असतात.* त्यात
*बाकीच्या कुटुंबानी यांना बहिष्कृत केलेले असते याचे कारण हे हिंदूचे देवदेवतांना मानत नाहीत आणि पूजाअर्चा करत नाहीत म्हणून हे बहिष्कृतांनी केलेले बहिष्कृत.*
त्यात गावकी करणारे महार, नवस बोलणारे, देवापुढे गऱ्हाणे घालणारे, महार पश्चिम महाराष्ट्रात मोठया प्रमाणात आढळून येतात.
*स्वतःला बौद्ध म्हणणारे देखील महाभाग पंचशील, तिसरण, पारमिता, वर्षावास पाळताना आढळून येत नाहीत.* 22 प्रतिज्ञाचे आचरण कधीच करत नाहीत जे प्रामाणिक आहेत त्याचे अभिनंदन करुन मी पुन्हा म्हणतो की *काही बौद्ध म्हणणाऱ्यांनी दोन्ही धर्मात मिलावट केली आहे . अर्थात दोन्ही धर्म नासवले.
यावर उपाय काय?
प्रत्येकाने आपआपला धम्म जाणुन घेवुन त्या त्या धम्माचे किवा धर्माचे पालन केले पाहिजे.
*हिंदू महार मानणार्यांनी आपले हिंदूचे सण, उस्तव, जत्रा उघडपणे साजर्या कराव्यात, उघडपणे गर्वाने आपण हिंदूच असल्याचे जाहीर करावे, सांगावे.*
बौद्ध, नवबौद्ध म्हणणार्यांनी वरीलप्रमाणेच उघडपणे *बौद्ध कालगणना, बौद्ध उस्तव, पौर्णिमा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, त्रिसरण, पंचशील, अष्टशील, दहा पारमिता जाणुन घ्याव्यात त्यानुसार आचरण करावे.*
‘उपोसथ, वर्षावास, पुण्यानुमोदन, वाढदिवस, गृहप्रवेश, इ. चालीरीतींचे पालन करावे.
यासाठी *बौद्धांनी आपल्या भिक्खुसंघाचे, बौद्धाचार्य, धम्ममित्र, उपासक वर्ग यांचे मार्गदर्शन घ्यावे मात्र हे करताना अगोदर या मार्गदर्शकांकडुन धम्माचे पालन होते का नाही याचे अत्यावश्यक निरीक्षण करावे. अंधानुकरण करु नये.*.
कारण
*बौद्ध म्हणजे ज्ञानी लोक.*
*बौद्ध म्हणजे विज्ञानवादी लोक..*
*बौद्ध म्हणजे अनुसरणीय लोक…*
*” चलो बुद्ध की ओर…!
प्रतिकार न्यूज