Home Breaking News तुलाना येथे तलावात पोहताना तरुणाचा जलसमाधी… राजुरा,तालुक्यातील दुखःद घटना…

तुलाना येथे तलावात पोहताना तरुणाचा जलसमाधी… राजुरा,तालुक्यातील दुखःद घटना…

42
0

राजुरा

तुलाना येथे तलावात पोहताना तरुणाचा जलसमाधी
राजुरा. –

राजूरा तालुक्यातील तुलाना येथील तलावात पोहताना त्यात बुडून गावातील सेवन वसंत ठाकरे, वय 18 या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे राजुरा जवळीक तुलाना या गावावर शोककळा पसरली आहे.
गुरुवारला दुपारी एक वाजता तुलाना गावातील चार तरुण गावाजवळील माजी मालगुजारी तलावात पोहायला गेले होते. या चौघांनी काठावर कपडे व चपला काढून चौघांनीही तलावात उड्या घेतल्या. पोहत असताना अचानक सेवन हा दिसेनासा झाला. सेवन च्या समोर एक तरुण पोहत होता, त्याला ईतर मित्रानी तलावा बाहेर काढले, मात्र सेवन चा पत्ता लागला नाही. अखेर या मुलानी गावात येऊन माहिती दिली.
घटनेची माहिती विरूर स्टेशन पोलिसाना देण्यात आली. पोलिसानी कोळ्यांच्या सहाय्याने प्रेताचा शोध घेणे सुरू केले. मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत शोध लागु शकला नाही. या तलावात पाणी भरपूर आहे, त्यामुळे प्रेत शोधायला अडचण जात आहे. अखेर ही शोधमोहीम थांबविण्यात आली. आज शुक्रवारला या तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होणार आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here