सिंधुदुर्ग….
वेंगुर्ला पंचायत समितीचे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले न्हानू जगन्नाथ सरमळकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की नवबौद्धांना न्याय देण्याच्या वेळीच नियम बदलतात,त्याचा पुरावा म्हणजे च न्हानु जगन्नाथ सरमळकर प्रकरण होय.
यांना पदोन्नती मिळण्यापासून वंचित ठेवले आहे. म्हणून दिनांक १० नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू आहे आजचा ९ वा दिवस आहे. याठिकाणी जाहीर केले प्रमाणे कोरोना नियमावलीचे पालन करुन घंटानाद सह भीमगीते सुरू आहेत. पाठिंबा देण्यासाठी चंद्रकांत अणावकर गुरुजी दिसत आहेत
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, सिंधुदुर्ग परिषद सेवेतील शासनकर्त्या जमातीच्या कार्यपद्धतीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जातीवादी आहे का ? होय ,अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आणि म्हणूनच आम्ही 26 जानेवारी पासून जी आंदोलन सुरू केली त्यावरुन दिसून येत आहे. या आंदोलनाला भेट दिली होती ती आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा महोदय,माजी समाज कल्याण सभापती भेटून गेले, ते परत आलेच नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांनी ही स्थायी समिती मध्ये विषय घेऊन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो म्हणाले तेही नॉटरिचेबल झाले. या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे, जर माझं काय चुकलं आहे ते तरी कागदावर दाखवून द्याल अशी आशा आहे. लोकशाहीच्या पद्धतीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे कार्यरत असलेले लोकप्रतिनिधी इकडे लक्ष देतील अशी आशा करतो. वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेली शासनकर्ती जमात आमच्या लोक लोकप्रतिनिधींची दिशाभूल करतात का ? की, आमचे लोकप्रतिनिधी जिपच्या कामकाजाच्या अभ्यासात कमी असल्याचे मुद्दाम दाखवतात ? असा प्रश्न उभा राहतो.
रावजी गंगाराम यादव जिल्हाध्यक्ष…
प्रतिकार न्यूज