Home Breaking News ब्रेकिंग : बल्लारपूरात मर्डर : मृतक – सुनील सिमलवार : पोलीस तपास...

ब्रेकिंग : बल्लारपूरात मर्डर : मृतक – सुनील सिमलवार : पोलीस तपास सुरु,

6
0
निलेश नगराळे
प्रतिकार/ चंद्रपुर प्रमुख  : 
 
बल्लारपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत्या क्रमांकावर आहे. दिनांक 19 नोव्हेंबर ला शहरातील चंद्रपूर स्लज गार्डन च्या समोर नाग मंदिर परिसरातील(पुराना धोबीघाट) एका झोपडीत सुनील सिमलवार वय – 27 वर्ष रा. महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारपूर यांचा खून झाल्याची घटना घडली आहे. शहरात काल सायंकाळी 8:00 वाजताच्या सुमारास सदर घटनाकृत्य आपसी मतभेदांमुळे घडल्याची माहिती असून मृतकाच्या चेहऱ्यावर मार असल्याचे प्रत्यक्षदर्शीच्या माहिती आहे.
 
बल्लारपूर शहरात वाढत्या गुन्हेगारी मुळे पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहे तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस करीत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here