Home कृषी शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी सीसीआयने कोरपणा तालुक्यातील तीन जिनिंगच्या निविदा उघडाव्या * शेतकरी...

शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी सीसीआयने कोरपणा तालुक्यातील तीन जिनिंगच्या निविदा उघडाव्या * शेतकरी संघटनेची मागणी ….

4
0

चंद्रपूर…

शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी सीसीआयने कोरपणा तालुक्यातील तीन जिनिंगच्या निविदा उघडाव्या
* शेतकरी संघटनेची मागणी

चंद्रपूर,17 नोव्हेंबर-
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील सीसीआयच्या कापूस खरेदीसाठी काही जिनिंग व प्रेसिंग संचालकांनी निविदा भरल्या होत्या. मात्र यातील तीन निविदा अद्यापही उघडल्या न गेल्याने कोरपणा सारख्या मोठ्या कापूस उत्पादक भागातील शेतकर्‍यांची मोठी गैरसोय व कुचंबणा होणार आहे. त्यामुळे तातडीने टेंडर उघडून या तीनही जिनिंगला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने मा. जिल्हाधिकारी, मा. सहकार व पणन आयुक्त व जिल्हा निबंधक यांचे कडे केली आहे.
भारतीय कापूस महामंडळाने ( सीसी आय ) राज्यातील कापूस उत्पादक वीस जिल्ह्यात प्रथम 64 कापूस संकलन केंद्रे उघडली होती. परंतु ही संख्या अत्यंत अपुरी असल्याने शंभर केंद्र मंजूर करण्याची मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री, पणन मंत्री व पणन आयुक्त यांचेकडे केली होती. यानंतर पुन्हा 18 केंद्र मंजूर होऊन ही संख्या 82 पर्यंत गेली. परंतु अजून अठरा कापूस खरेदी केंद्रांची गरज आहे.
कोरपणा तालुक्यात एक सीसीआय केंद्र मंजूर असून ते सोनुर्ली गावाजवळ आहे. कोरपणा परिसरातील गुरुदेव कॉटन अँड. प्रोसेसिंग कंपनी, धोपटाळा, विदर्भ कॉटन प्रोसेसर,चनई खुर्द व सरस्वती जिनिंग अँड. प्रेसिंग कंपनी, धोपटाळा या तीन कंपन्यांनी भरलेले टेंडर अद्याप ओपण झालेले नाही. सोनुर्ली पासून परिसरातील व तेलंगणा सीमेवरील गावे 40 ते 50 किलोमीटर परिसरात आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय व अन्याय होणार आहे. शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी,व्यापक जनहित व कापूस उत्पादक शेतकरीहित लक्षात घेता कोरपणा तालुका मुख्यालया जवळील तिन्ही जिनिंगचे टेंडर उघडून सीसीआयने तातडीने कापूस खरेदी करण्याची परवानगी द्यावी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे विक्रीसाठी आणण्याचे अंतर कमी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा आणि कापूस उत्पादक शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करावा,अशी मागणी मा. जिल्हाधिकारी,मा.सहकार व पणन आयुक्त आणि जिल्हा निबंधक यांचेकडे शेतकरी संघटनेचे नेते, माजी आमदार अँड.वामनराव चटप, अरुण नवले, प्रभाकर दिवे, नीलकंठ कोरांगे, रमाकांत मालेकर, अँड.श्रीनिवास मुसळे, प्रविण गुंडावार, बंडू राजूरकर, अविनाश मुसळे, मारोतराव काकडे, रविंद्र गोखरे, मदन सातपुते, रत्नाकर चटप, आशिष मुसळे, पद्माकर मोहितकर, पोर्णिमा निरांजने, प्रा. ज्योत्स्ना मोहितकर, संध्या सोयाम, संजय येरमे, सत्यवान आत्राम, बाजार समिती संचालक सुरेश राजूरकर, बाळू बोडखे, पांडुरंग आवारी, भीवसन जुमनाके व माधव पेंदोर आणि नगरसेवक सुभाष तुराणकर यांनी केली आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here