Home कृषी ऐन दिवाळीच्या दिवसात युवा शेतकऱ्याची गळफास लाउन आत्महत्या……. ….

ऐन दिवाळीच्या दिवसात युवा शेतकऱ्याची गळफास लाउन आत्महत्या……. ….

17
0

विरूर….

ऐन दिवाळीच्या दिवसात
युवा शेतकऱ्याची गळफास लाउन आत्महत्या

विरुर (स्टे.) – वार्ताहर
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील युवा शेतकरी सुरेश बंडू दोरखंडे वय 40 वर्षे हा सकाळ च्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास सुरेश हा शेताकडे जातो म्हणून निघाला. बराच वेळ होउन घरी परत न आल्याने घरचे मंडळी शोधाशोध सुरू केली.मात्र वडस्कर यांच्या शेतालगत असलेल्या झाडाला गडफास लावले असल्याचे गुराखाचा लक्षात आले तेंव्हा तो ही माहिती गावकर्यांना दिली.
सुरेश दोरखंडे यांचे कडे चार एकर शेती आहे. या वर्षी परतीच्या पावसाने शेतीचे फार मोठी नुकसान केले. शेतातील सोयाबीन, कापुस ही नगदी नुकसान झाल्याने सुरेश काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. बँक ऑफ इंडियाचे 20 हजाराचे कर्ज ही होते.
घटनेची माहिती होताच विरुर पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.या वर्षी पावसाने शेतातील असलेल्या कापूस सोयाबीन पिकाची नुकसान झाले आहेत.ऊत्पन्न सुध्दा कमी झाले आहे.º

प्रतिकार

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here