राजुरा….
गोंडपीपरी येथे फेडरेशनचे कापूस खरेदी केंद्र मंजूर करावे
ऍड. वामनराव चटप यांची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी येथे दरवर्षी सुरू असणाऱ्या कापूस फेडरेशनच्या कापूस खरेदी केंद्राला अद्याप मंजुरी मिळाली नाही. गोंडपीपरी येथील हे फेडरेशन चे कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते, माजी आमदार ऍड.वामनराव चटप यांनी राज्याचे पणनमंत्री व सहकार व पणन आयुक्त यांचे कडे केली आहे.
दरवर्षी गोंडपीपरी येथे फेडरेशनच्या कापूस खरेदी केंद्राला मंजुरी मिळून त्याद्वारे या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय होते. गोंडपीपरी व पोम्भूर्णा या तालुक्यातील शेतकरी या गोंडपीपरीच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणतात. मात्र अजूनही हे केंद्र मंजूर न झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. म्हणून फेडरेशन चे हे कापूस खरेदी केंद्र तातडीने मंजूर करून सुरू करावे, अशी मागणी ऍड. वामनराव चटप यांनी राज्याचे पणन मंत्री व सहकार व पणन आयुक्त यांचेकडे केली आहे.
शेतकरी संघटनेने यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात सिसिआय व फेडरेशन यांचे केंद्रे सुरू करण्याची मागणी केली होती, ती पूर्ण झाली असून आता दिवाळीनंतर कापूस खरेदी सुरू होत आहे.
प्रतिकार न्यूज