राजुरा….
महिलासाठी ‘उमेद’असणारी ग्रामोन्नतीच्या खाजगिकरणामुळे होणार ‘ना-उमेद’?,तीव्र आंदोलनाचा इशारा
राजुरा,-चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-
ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वागीण विकासात उमेद चे महत्वपूर्ण योगदान असून ग्रामोन्नती विभागाद्वारे सुरू असलेली उमेद खाजगिकरणामुळे ना-उमेद होण्याची वेळ येत आहे खाजगिकरणाचा निर्णय रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उमेद कार्यकर्त्यांनी दिला आहे.
#ग्रामीण पीडित,गरीब,एकल,परितक्त्या, विधवा,घटस्फोटित महिलांच्या सर्वागीण विकासासाठी शासनाने ग्रामोन्नती विभाग सुरू करून उमेद अंतर्गत निवडक महिलांना विशेष प्रशिक्षण दिले या उमेद कार्यकर्त्यांनी गावातील महिलांचा संघ करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी बचत गट,किंवा अन्य मार्गाने आर्थिक,सामाजीक,आधार दिला जात आहे आज एकट्या राजुरा,जिवती,कोरपना,गोंडपीपरी, सुमारे 193 प्रशिक्षित महिला विविध विषयाचे कार्यकर्ती तथा उमेद कार्यकर्ती म्हणून कार्यरत आहेत या विभागाचे कर्मचारी आणि उमेद कार्यकर्ती याचे चागले समनवायामुळे त्या भागातील महिलाजना मोठी उमेद होती परंतु शासनाने हा विभागचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या कर्म चारिसह सह उमेद कार्यकर्तीत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
इतक्या वर्षयानंतर ग्रामीण महिला उमेद माध्यमातून सक्षम होत आहे खाजगीकरण केल्यास महिलांची प्रगती वर नियंत्रण येईल त्यामुळे खाजगीकरण करण्यात येऊ मस्ये अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषद द्वारे उमेद कार्यकर्ती नि दिला आहे.
याबाबत अधिक माहिती देत आहेत उमेद कार्यकर्ती महिला
प्रतिकार न्यूज