राजुरा..
विशेष प्रतिनिधी…
राजुरा शहरात रेती उत्खनन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतातून जेसीबी मशीन लावून रस्ता करून कापूस पिकाची नासाडी…!
कापसाच्या शेतातील रस्ता पहा कसा जेसीबी मशीन लावून रस्ता तयार करण्यात आला…
प्रतिकार न्यूज
रेती तस्कर रेतीची चोरी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतातून जेसीबी मशीन लावून रस्ता करून कापूस पिकाची नुकसान करीत आहेत.शेतकरी बांधवांच्या जेसीबी मशीन लावून रस्ता तयार केला.त्यासाठी चक्क कापूस उभे असलेल्या शेतातून रस्ता तयार करण्यात आला दोन्ही बाजूला उभे असलेले कापसाचे झाडावर जेसीबी मशीन लावून रस्ता केला.त्यात शेतकरी बांधवांची आर्थिक नुकसान होत आहे.
शहरातील काही ठराविक रेती उत्खनन करण्यासाठी चार पाच ट्रकटर रात्री रेती चोरी करीत आहेत.
तालुक्यातील काही ठिकाणी मोजक्या लोकांना तलाठी अप्रत्यक्षरीत्या त्यांना सहकार्य करीत नाही नां!असा प्रश्न उपस्थित होतो.काही वाहने ताब्यात घेतले असले तरी, कोणाला सुट द्यायची आणि कोणाला फायदा मिळवून देण्यासाठी तलाठ्यांच्या मर्जीतील लोकांना सर्व सुट द्यायची असा प्रकार सुरू आहे.
यातील अनेक ट्रकटर मालक चौकात बोलताना सांगत आहेत.
कापसाच्या शेतातील रस्ता पहा कसा जेसीबी मशीन लावून रस्ता तयार करण्यात आला.
प्रतिकार न्यूज