राजुरा…
राजुरा विधानसभा क्षेत्रातील बांधलेले काही बंधारे चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली.अधिकारी आता लागले शोधाशोध करायला.!
राज्य सरकारने शेती विषयक अनेक चांगले निर्णय घेण्यात आला आहे.परंतु दर्या योजना राबविण्यात येतात त्या योग्य प्रकारे नियोजन करूनच चर्या चर्या योजनेची अंमलबजावणी करणे आवश्यक असते.
तर दुसरीकडे ज्या अधिकारी यांचेकडे सिंचनाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.असे अधिकारी कधिही योजने चांगल्या रीतीने राबविण्यात आली नाही.मागील युती सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही चांगली योजना शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त होती.जलसाठ्यातुन संरक्षीत सिंचन व्यवस्थेवर भर देण्यात आला होता.शेततळे,मातीनाला ,बांध, सिमेंट प्लग बंधारे, डाळीचे बांध,नाला खोलीकरण,मजगी ,कसे अनेक कामे करण्यात कोट्यावधी रुपये खर्च करून आर्थिक लुट केली जात असल्याचा आरोप होत आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रातील परीसरात केलेले काम फक्त काही ठिकाणी कागदांवरच असल्याचे दिसून येते.
सिंचन विभागातील काम मंजूर सोसायटी यांना मिळाले पाहिजे म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी यांनी कामासाठी शिफारस केली. मंजूर केलेली कामे
मजुर सोसायटी च्या वतीने करण्यात आलेले काम अनेक ठिकाणी कागदांवरच असल्याचे दिसून आले.
काही ठिकाणी अधिकारी यांचेसोबत पार्टनरशिप मध्ये असल्याने, आणि काम प्रत्यक्ष करतांना अंदाजपत्रकातील दिशा निर्देशाला केराची टोपली दाखविण्यात आली.सूकडपलली येथील अर्धा बंधारा वाहून गेला.गोंडपिपरी तालुक्यातील काही गावांमधील कामे कागदावरच असल्याने, जनतेच्या तक्रारीवरून शासनाच्या वतीने चौकशी सूरु झाली तर आपण अडचणीत येऊ शकतो, म्हणून अधिकारी धावपळ करायला लागले आपला बंधारा शेतात आहे की कागदांवर बिले काढून पण सर्व मोकळे झालेत,पण आता काही ठिकाणी बंधारे कागदावर आहे की शेतात कोठे आहेत त्यांची शोधाशोध सुरू झाली असल्याचे समजते.
प्रतिकार न्यूज