चंद्रपूर…
वनविभागाचे कर्मचारी मुख्यालयाला दांडी
रेती तस्कराची कशी करतील कोंडी !
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक दिवसांपासून रेतीची चोरी वाहतूकदारांना सुगीचे दिवस आले आहेत.जिल्हातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या बाबत वरीस्टाना काही घेणं देणं नसल्याचं दिसून येते.
वन विभागाच्या अनेक ठिकाणी ग्रामीण भागात लाखोंची मालमत्ता आहे . मागील नऊ,दहा वर्षांपासून , अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाही.त्यामुळे वनविभागाची मालमत्ता लावारीस पडलेली आहे.
विहीर गाव , नलफडी,टेंभुरवाही,देवाडा, चिंचोली मुख्यतः वन विभागाच्या परीसरात चांगल्या उत्कृष्ठ रेतीचा साठा आहे.मागील दोन वर्षांपासून रेती घाट लीलाव होत नसल्याने ,रेती उत्खनन करणारे अशा संधीचा फायदा घेत आहे.
जंगलातील वाघाच्या भिंतीचे सावटाखाली शेतकरी शेतमजूर सापडला आहे.मात्र चोरी वाहतूकदारांना सुगीचे दिवस आले.अनेकाणी आपले जिव गमावले ,शेतीचा हंगाम आणि जंगली जनावरांची भिंती रानडुक्कर यांनी शेतकरी ,बांधवांचे कंबरडेच मोडले आहे.
जंगल शेजारी शेती असल्याने ,राखण कशी करायची गेलं तर जंगलातील वाघाच्या भिंतीचे, रानडुक्कर ची भिंतीचे सावट , अनेकांच्या शेतमालाची रान डुकरानी वाट लावली.
प्रतिकार न्यूज