Home शैक्षणिक .डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन “जागतिक विद्यार्थी दिन” म्हणून साजरा व्हावा”*

.डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन “जागतिक विद्यार्थी दिन” म्हणून साजरा व्हावा”*

46
0

नागपूर…

: एन. पी. जाधव.द्वारा..

*”डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन “जागतिक विद्यार्थी दिन” म्हणून साजरा व्हावा”

– भन्ते अश्वजीत*

दै. वृत्तरत्न ‘सम्राट’मध्ये दि. ४ नोव्हेंबर, २०२० रोजी तिसर्‍या पानावर एक बातमी वाचनात आली. बातमीचे शीर्षक आहे *”विद्यार्थी दिवस”* लाखो स्मरणपत्रे पाठविणार… प्रधानमंत्री, राष्ट्रपतींना रक्ताने लिहिणार पत्रे… आणि त्याखाली मजकूर असा आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साताऱ्यात गेले येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रारंभ झाला. ७ नोव्हेंबर, १९०० रोजी त्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे इयत्ता पहिली मध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन *’विद्यार्थी दिवस’* म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयातून शासनस्तरावर साजरा व्हावा यासाठी १५ वर्षे महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरला. या आग्रहाला दाद देत सरकारने तीन वर्षांपूर्वी विद्यार्थी दिवस घोषित केला. आता हा *विद्यार्थी दिवस* भारतभर होण्यासाठी दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी यासंबंधी अधिकृत घोषणा करावी. यासाठी राज्यभरातून १ लाख २० हजार पत्रे दिल्लीला पाठविणार असून काही पत्रे रक्ताने लिहिणार असल्याचे “विद्यार्थी दिवसा”चे प्रवर्तक अरुण जावळे यांनी स्पष्ट केले.

खरे तर इथे मुद्दा असा आहे की, भारत घडविण्यासाठी जन्म घेतलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर! शिक्षणाची एकही संधी न सोडणारे विद्यार्थी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! तारापूरवाला बुक सेलर्स कडून नवनवीन पुस्तके उधारीवर घेतल्यामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी १९३६ साली आपले ‘चारमिनार इमारत’ विकणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! जगातील सर्वश्रेष्ठ घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर! कोलंबिया विद्यापीठाने ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून गौरवलेले नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! अशा महान व्यक्तीने शिक्षणासाठी पहिले पाऊल ज्यादिवशी शाळेत टाकले तो दिवस *विद्यार्थी दिन* म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारला काय अडचण आहे? अशी महान व्यक्ती; की ज्या महान व्यक्तीचा जगभरात गौरव सुरू आहे. जगभरात अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे उभारले जात असतांना त्यांच्या अथांग ज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी जगभरातील धडपडणारे विद्यार्थी असतांना हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून का साजरा होऊ नये?

यासंदर्भात एक गोष्ट इथे सांगण्यासारखी आहे ती ही की, इंग्लंडमधील सिडनहॅम कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दर्शनी भागात आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री इंग्लंड मध्ये गेले असतांना त्यांनी तो पुतळा पहिला. आणि ते सरळ त्या कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथल्या प्रिन्सिपालांना त्यांनी उपरोधाने म्हटले की, “तुमच्या इंग्लंडमध्ये लोकांची काय कमी आहे? की, तुम्ही भारतातील या हलक्या जातीच्या माणसाचा पुतळा येथे बसवला?” त्यावर त्या प्रिन्सिपालांनी फार शांततेने त्यांना उत्तर दिले ते म्हणाले, “साहेब ! या कॉलेजमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी यांच्यासारखा शिकला पाहिजे. यासाठी तो पुतळा इथे बसलेला आहे. तो कोणत्या जातीचा आहे, हलक्या जातीचा आहे की वरच्या जातीचा आम्हाला काही माहीत नाही? परंतु त्या विद्यार्थ्याने या कॉलेजचं नाव जगात अजरामर करून टाकलं!” प्रिन्सिपल साहेबांनी जे उत्तर दिलं ते ऐकल्यावर त्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होता. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की, इतक्या सगळ्या गोष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत सकारात्मक असतांना भारतामध्ये त्यांचा ‘शाळा प्रवेश दिन’ हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात काही अडचण आहे? काय हरकत आहे? यासाठी अशा मागण्यांची आवश्यकताच नाही, कारण भारताची घडी बसवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. आजही त्यांच्या तत्वावर भारत देश खऱ्या अर्थाने चालत आहे.

संकलन
एन पी जाधव

प्रतीकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here