Home शैक्षणिक विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनास 120 वर्ष...

विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनास 120 वर्ष पूर्ण …

55
0

प्रतिकार…
शितल खाडे.सांगली…

 

शनिवार, दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२०.विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिन

 

आज १२० वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने भारतातील सकल देशवासीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

 

दिनांक 7 नोव्हेंबर १९०० रोजी‌ बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये आता प्रतापसिंह हायस्कूल, सातारा

पहिल्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स.१९०४ पर्यंत म्हणजेच इयत्ता चौथी पर्यंत या शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज आजही या शाळेने जपून ठेवला आहे. इ.स. २००३ पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहेत. या दिनाला ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी अनेकदा महाराष्ट्र शासनाला केली होती. इ.स. २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने ०७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले.

‘विद्यार्थी दिवस’ हा विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांच्या सन्मानार्थ दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला.

अतिउच्च दर्जाची विद्वता आणि ज्ञान असतानाही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला *’विद्यार्थी दिन’* म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बहुभाषी होते. मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी भाषा, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक भारतीय व विदेशी भाषा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकलेले होते. यापैकी अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.

ज्ञानसुर्य महामानव बाबासाहेब डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांच्या शाळेतील पहिल्या पाऊलास मि विनम्रपणे नतमस्तक होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन.

              संकलन

    शितल खाडे सांगली.

मोबाईल 9403573150.
ई-मेल आयडी. [email protected]

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here