Home राजकारण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयु.इंजि.राहुल वानखेडे.पेशाने इंजिनिअर…

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयु.इंजि.राहुल वानखेडे.पेशाने इंजिनिअर…

66
0

नागपूर…

*इंजि.राहुल दहीकर…द्वारा

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयु.इंजि.राहुल वानखेडे.पेशाने इंजिनिअर….

 

पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहिर झाली.१डिसेंबरला मतदान आहे.५नोव्हेंबर पर्यंत नोंदणी होणार.ती तारीख गेली. त्यानिमित्त राजकीय पक्षात उत्साह दिसत आहे.

भाजप,कॉंग्रेस,वंचित बहुजन आघाडी व इतर पक्ष उमेदवारी जाहिर करतील.अर्थात इथे पक्षविहीन उमेदवार सुध्दा रिंगणात असतील.उमेदवारी मागे घेण्याची तारीखही जाहिर झाली.

 

आजपर्यंत भाजपचा उमेदवार जिंकत आलेला आहे.तो इतिहास आहे.काहीही असो,पदवीधर संघाची निवडणूक एक प्रकारे राजकारणाचा आखाडाच असतो.यात दुमत असण्याचे कारण नाही.

पक्षविहीन उमेदवार पँनल निर्माण करुन निवडणूकीत उतरणे ही महत्वाची तशीच अधोरेखित करणारी बाब.

‘खूप लढलो बेकीने,आता लढू एकीने’ ही घोषणा देवून चक्क दोन उमेदवार निवडणूकीत लढत आहे.ही घोषणा आजवरच्या आंबेडकरी राजकीय क्षितिजावर बऱ्याचदा ऐकण्यात आली.आजही अधून मधून सूरु असतेच.पूर्णत्वास मात्र जात नाही.

या नावाअंतर्गत लढणारे शिक्षित दुसरा उच्चशिक्षित?आहे. तरुण आहे.वय त्यांचे बाजूने.खूप पावसाळे बघायचे हे वय.शिक्षण घेण्याचे वय.अर्थार्जन करण्याचे व शोधण्याचे.बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना उद्भबोधित करतांना, त्यांनी काय करावे वा करु नये सांगितले आहे.ते वेगवेगळ्या शासनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथातून वाचावयास मिळते.शिक्षण सोडून राजकारणाकडे दूर्लक्ष करा,असे ते पोटतिडकीने सांगतात.

.पण आजच्या युवकांना सर्व काही झटपट हवे असते.त्यात दोघेही अपवाद असू शकत नाही. हे वर उपरनिर्देशित दोघांची उमेदवारी म्हणजे आपसात मतभेद व मनभेद दोन्ही दिसतात.या बेकी..एकीचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे,असे खेदाने सांगावेसे वाटते.

तिन्ही उमेदवारांनी म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांचे सोबत सामंजस्याने बसुन एक उमेदवार व तो ही राजकीय पक्षाचा असता,तर होणारी मतविभागणी टाळता येवू शकते.आजही वेळ गेलेली नाही. श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर याचे नेत्रुत्वात हे करता येईल.त्यानिमित्ताने ऋण काही अंशी का होईना कमी होईल.कारण बाबासाहेबांचे ऋण तसेही फेडता येत नाही. त्यांच्या ऋणातच आपण असावं ,असे समाजातील प्रत्येक समाजबंधूना वाटते. ते आपणास ही वाटावे.

आता निवडणूकी संदर्भाने बोलायचे झालेच ,तर कुणाला मतदान करावे,त्याबद्दल काही निकष असतात.उमेदवारांची तुलना करणे अतिआवश्यक होवून जाते.कोणासोबत तुलना होवू शकते?यावर डॉ. बाबासाहेबांचे विचार आहेत.खाली दिले आहे.
Comparisons are always odious and unpleasant.At the same time it is true that there is nothing more illuminating than comparisons.Ofcourse in making them one must bear in mind that to be interesting and instructive comparisons must be between those that are alike.
उपरोक्त बाबी वर विचार केला तर हे शक्य नाही.आपण दोघेही बाकी उमेदवाराचे समकालीन नाहीत.इंजि.राहुल वानखेडेचेही नाहीत.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयु.इंजि.राहुल वानखेडे.पेशाने इंजिनिअर.

सध्या सेवानिवृत्त. महाराष्ट्र प्रदुषण

मंडळात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होते. साहित्यिक, लेखक,कवी असा प्रवास!वयाच्या १८व्या वर्षापासून आंदोलनरत.नामांतरच्या लढ्यात सहभाग. सामाजिक चळवळीत आजही कार्यरत. अनुभवसंपन्न.पक्षाने टाकलेला विश्वास या जमेच्या बाबी आहेत.पूर्व विदर्भाचे प्रभारी…इ.अनेक सांगता येईल

निवडणूकीच्या राजकारणात शिरणे याचा अर्थ आपला पक्ष स्थापन करणे असा होतो.पक्षाचा पाठिंबा नसलेले राजकारण ही कल्पनेतील वस्तु होय.स्वतंत्रपणे राजकारण चालविण्याचा व आपली पोळी आपणच पकविण्याचा प्रयत्न करणारे अनेक पुरुष आहेत.जो वा जे असा प्रयत्न करतात,स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतात,त्यांचेबद्दल नेहमीच सतर्क असणे गरजेचे आहे.जर एखादा राजकारणी माणूस कोणातही सहभागी न होण्याइतका स्वतंत्र असेल..तर कोणत्याही राजकीय उद्दिष्टासाठी तो निरर्थक आहे.तो काहीच साध्य करु शकत नाही. त्याच्या एकाकी प्रयत्नाने गवताचे पिकही तो काढू शकत नाही. परंतु स्वतंत्रतेची हाव धरणारे पुरुष त्यांच्या बौध्दिक प्रामाणिकतेमूळे स्वतंत्र राहात नाही. तर जास्तीत जास्त मागण्या मागण्यासाठी ते स्वतंत्र राहातात.यामूळेच त्यांना पक्षशिस्तीच्या जाळ्यातुन मुक्त राहायचे असते. परंतु राजकारणात स्वतंत्र राहणाऱ्या अनेक राजकीय धुरीनांचा माझा अनुभव असाच आहे. पक्षाशिवाय खरे खुरे आणि परिणामकारक राजकारण असुच शकत नाही.
आता तरी जे म्हणतात की,या निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी व बी.एस.पी आणि इतर राजकीय पक्ष याचा संबंध नाही, त्यांचेसाठी हे उद्बबोधक ठरेल अशी आशा करायला हरकत नसावी.
दुसरे म्हणजे उमेदवाराची पात्रता काय असावी?८००००,किंवा दुसऱ्या उमेदवाराने ६००००आणि २५००० मतदार नोंदणी केली.मतदाराची नोंदणी करणे हा शासनाचा भाग आहे. हा पात्र उमेदवार असण्याचा निकष खचितच नाही. निवडणूक संहितेचा आधार घ्यावा व वाचून ठरवावे.प्रत्येकच उमेदवार मतदार नोंदणीसाठी प्रतिबध्द असतो.
आताही वेळ आहे.फक्त बौध्द मतदारांना ग्रुहीत धरुन चालणार नाही. बाकी ओबीसी,दलित ,आदिवासी इ.यांना सामावून घ्यावे.बेस वाढवावा लागेल.दिवस भयंकर आहेत.बघा प्रकाश पडतोय काय ते.सर्वांना एकत्र जाणे हे श्रध्देय बाळासाहेबांचे ध्येय आहे.
आपण जिथे अधिकारवाणीने सांगता व तसे पत्रकांमधून व पोस्टमध्ये आंबेडकर स्टुडेंट असोसिएशन चा उल्लेख करता तो सुध्दा संघटनेने धुडकावून लावला आहे.खरेखुरे राजकारण करा.सत्येच्या बाजूने करा.खोटेनाटे पसरवून निवडणूक जिंकता येत नाही.संविधानिक नैतिकता असू द्या.
आजही आपली उमेदवारी न भरता श्रध्देय बाळासाहेबांसोबत येवून,इंजि राहुल वानखेडे यांच्या उमेदवारीस पाठिंबा द्याल ही अपेक्षा आहेतच.मतविभागणी टाळा व बोला…….
आमचा उमेदवार एकच.’इंजि राहुल वानखेडे’यांनाच प्रथम वोट देवून निवडूण आणा.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here