Home आपला जिल्हा कामगारांच्या समस्या सोडविण्याचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे आश्वासन …

कामगारांच्या समस्या सोडविण्याचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे आश्वासन …

51
0

चंद्रपूर..

निलेश पझारे…द्वारा

कामगारांच्या समस्या सोडविण्याचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे आश्वासन

अधिष्ठाता डाॅ.हुमणे यांचे जन विकास सेने तर्फे स्वागत

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांचे जन विकास सेना संलग्नीत जन विकास कामगार संघा तर्फे स्वागत करण्यात आले.संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे यांची दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भेट घेण्यात आली तसेच पुष्पगुच्छ देऊन अधिष्ठाता पदी रुजू झाल्याबद्दल त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिकारी,
कर्मचारी,पॅरामेडिकल स्टाफ व कंत्राटी कामगार सर्व टीम कोविड आपत्ती मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांची जीव धोक्यात घालून सेवा करीत आहेत. त्याबद्दल नागरिकांच्या वतीने आभार सुद्धा व्यक्त करण्यात आले.यावेळी जन विकास कामगार संघाचे सतिश येसांबारे,कांचन चिंचेकर, अमोल घोडमारे, सतीश घोडमारे, राकेश मस्कावार, ज्योती कांबळे, सुनिता रामटेके, निलिमा वनकर, दर्शना झाडे, गिता दैवलकर, गीता मून, हेमा देशपांडे, संगीता लांजेवार, सुषमा शेलोकर, संगिता बावणे, सुवर्णा औतकर, भारती पचारे, सुवर्णा नवले,ज्योती वाघमारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर अधिष्ठाता कार्यालयांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित समस्यांच्या बाबत बैठक घेण्यात आली.या बैठकीला अधिष्ठाता डॉ. हुमणे व जन विकास चे अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे सह वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डाॅ.राजेंद्र सुरपाम,डाॅ.मनोहर भेंडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.संजय राठोड वरिष्ठ लिपिक किशोर पांढेन व अजय पेंढारकर उपस्थित होते. बैठकीमध्ये सर्व कामगारांचे थकित पगार दिवाळीच्या पूर्वी देण्यात यावे, कामगारांना मागील सहा महिन्यात दिलेल्या कमी पगारातील त्रुटींचा तातडीने निपटारा करण्यात यावा,अनेक वर्षापासून विविध पदावर काम करणाऱ्या कामगारांचे पद सुनिश्चित करण्यात यावे, कामगारांचे पद व अनुभवानुसार ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावी,मार्च महिन्यापूर्वी कंत्राटदाराकडे शिल्लक असलेला कामगारांचा पगार थेट वैद्यकीय महाविद्यालया तर्फे देण्यात यावा इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले व सर्व मागण्यांच्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.कंत्राटी कामगारांच्या सर्व रास्त मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी अधिष्ठाता डॉ. हुमणे यांनी जन विकास कामगार संघाला दिले.

 

 

निलेश पाझारे

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here