Home आपला जिल्हा *वरोरा येथील तालुका क्रीडा संकुल येथील विविध समस्या तात्काळ सोडवाव्या- ABVP वरोराचे...

*वरोरा येथील तालुका क्रीडा संकुल येथील विविध समस्या तात्काळ सोडवाव्या- ABVP वरोराचे लोकप्रतिनिधीना निवेदन*

23
0

शकील शेख

प्रतिनिधी

वरोरा :- स्थानिक वरोरा क्षेत्रातील शासकीय तालुका क्रीडा संकुल येथे वरोरा शहरातील विद्यार्थी व विद्यार्थ्यींनी, जेष्ठ नागरिक व क्रीडा प्रेमी येथे रोज फिरण्याकरिता व खेळण्याकरिता मोठ्या प्रमाणात येतात. पण क्रीडा संकुल हे विविध समस्यांचे माहेर घर बनले आहे. या ठिकाणी गवताचा कचरा व घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना होतो स्वच्छता व प्रसाधन गृह आहे पण ते वापरण्यात येत नाही व ते बंद असून दुर्गंधी अवस्थेत पडलेले आहे . ते चालू करण्यात यावे व सुरक्षा भिंतीची पडझड झाली आहे. व रात्री दिव्यांची दुरवस्था झाली आहे. वॉकिंग ट्रॅक वर कचरा वाढलेला आहे व तिथे तात्पुरता एक शेड तयार करून देण्यात यावा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी अश्या विविध समस्या तात्काळ सोडविण्यात यावे.व शहरातील नागरिकांना सुसज्ज क्रीडा संकुल तयार करून द्यावे. अश्या मागण्या घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा वरोरा तर्फे स्थानिक आमदार वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र मा. प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अहेतेशामजी अली व उपविभागीय अधिकारी श्री. सुभाष शिंदे यांना निवेदन स्वरूपातून करण्यात आले आहे. यावेळी अभाविप जिल्हा समिती सदस्य शकील शेख , नगरमंत्री तृप्ती गिरसावळे, क्रीडा प्रमुख स्वाती हनुमंते , महाविद्यालय प्रमुख लोकेश रुयारकर , सोशल मीडिया प्रमुख हर्षदा बावणे, अंकित मोगरे, सौरभ साखरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here