*सुहास गोगुलवार *
विशेष प्रतिनिधी
विशेष प्रतिनिधी
पत्रकारांना प्रत्येकी १ लाखाचा मोफत विमा जाहीर
राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांचा मोठा निर्णय पत्रकारांची सुरक्षा व न्याय हक्कासोबतच आता “सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन” ने पत्रकारांचे जीवन सुरक्षित व्हावे यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी भारतातील “सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन” a.k.a. “केंद्रीय पत्रकार संघ” च्या सभासदांना तसेच पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा मोफत विमा जाहीर करण्यात आला आहे असे “सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन” चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी सांगितले आहे.
आगामी येणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व पत्रकार सभासदांना प्रत्येकी १ लाख रुपये विम्याच्या प्रमाणपत्रासोबत ओळखपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी केली आहे.
“सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन” ची स्थापना हि १३ मार्च २०२० रोजी झाली असून गेल्या ७ महिन्यांमध्ये महाराष्ट्रासहित, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश, बिहार, मेघालया, वेस्ट बेंगाल, ई. राज्यांत आपले वर्चस्व स्थापित केले आहे. या दरम्यान कोरोनाचे संकट असून सुद्धा “सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन” च्या प्रत्येक पत्रकार सभासदांनी पुढाकार घेऊन संपूर्ण भारतात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.
“सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन” तर्फे प्रत्येकी १ लाख रुपयांचा मोफत विमा जाहीर केल्यामुळे पत्रकारांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण होताना पाहायला मिळते आहे. एवढ्या वर्षांमध्ये आमच्या जीवन सुरक्षेबाबत कोणीतरी पहिल्यांदाच पुढाकार घेतला आहे त्यामुळे आमचा आत्मविश्वास आता द्विगुणित झाला आहे असे “सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन” च्या सभासदांचे म्हणणे आहे.
लवकरच “सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन” च्या प्रत्येक पत्रकार सभासदाच्या विकासासाठी योग्य ती पाऊले उचलण्यात येणार आहेत त्यासाठी संबंधित मंत्रालयीन अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे संदिप कसालकर यांनी सांगितले आहे.