राजुरा…
कर्तव्यदक्ष अधिकारी हे तालुक्यासाठी भूषणावह – ऍड. चटप
*
डीवायएसपी स्वप्नील जाधव यांना शेतकरी संघटनेद्वारे निरोप
राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील जाधव यांची गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा पोलीस उपविभागात उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली असून शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ऍड. वामनराव चटप म्हणाले की,कर्तव्यदक्ष व आपल्या कामाप्रती निष्ठा ठेऊन सामान्य जनतेची कामे सचोटीने करणारा अधिकारी सर्वानाच हवाहवासा वाटतो. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांचे नंतर स्वप्नील जाधव हे वरिष्ठ अधिकारी बदली होऊन जात आहेत. डीवायएसपी स्वप्नील जाधव यांनी या भागातील कायदा व व्यवस्थेची स्थिती चांगल्या रीतीने सांभाळली. यावेळी त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ऍड. मुरलीधर देवाळकर,रमेश नळे,मधूकर चिंचोलकर,दिलीप देरकर,विश्वास साळवे,कपिल इद्दे,बळीराम खुजे, हसन रिझवी, बंडू देठे, सय्यद शौकत अली, पुंडलिक वाढई, जुबेर शेख, सूरज गव्हाणे, मतीन शेख यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिकार न्यूज