राजुरा….
प्रतिकार…
राजुरा महसूल विभागात दिव्याखाली अंधार,
कुंपनच शेत खात
राजुरा शहरात एक नविवच चर्चा ऐकायला मिळत आहे.तलाठी बांधवाच पटवारी भवन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रेती,गिटटी,भर भरण्यासाठी लागतो.या साठी भवन बांधकाम करण्यासाठी नविनच फतवा मटेरिअल पुरवठादार यांचेसाठी केला असल्याची शहरात खमंग चर्चा सुरू झाली आहे.
रेती लिलाव बंद आहे काम तर करायचे आहे .आणि पैशाची बचतही झाली पाहिजे , त्यासाठी रेती पुरवठा करणाऱ्या साठी खुष खबर ,एक गाडी रेती भवनाला दान द्या, आणि तुम्हाला लागते तेवढं घेवून जा.याचा परीणाम असा होत आहे.शहरात असलेले पाच ,सहा ट्रकटर रेतीची चोरी करीत असल्याने महसूल विभागाचे लाखों रुपयांचे उत्पन्न बुडत आहे .या सर्व प्रकरणात महसूल विभागाचे तलाठी ,मंडल अधिकारी जबाबदार आहेत.महसुल अधिकारी सुट्टीवर असल्याने त्याचा परिणाम झाला आहे.काही गाड्या तहसील चे आवारात जप्त करण्यात आल्या आहेत.ऊरलेले वाहतूकदार या संधीचा फायदा घेऊन ,रेती तस्करी करीत आहे.
प्रतिकार न्यूज