गोंडपिपरी…
गोंडपिपरी परीसरात रेती उत्खनन जोरात महसूल विभाग कोúमात
गोंडपिपरी परीसरात कापूस खरेदी करण्यासाठी खाजगी जिनिंग बांधकाम सुरू आहे.कापुस खरेदी सुरु आहे मात्र बांधकाम करण्यासाठी रेतीची आवश्यकता असते.ती रेती आणि इतर मटेरियल पुरवठा ठेकेदार चोरी ची रेती पुरवठा करीत आहेत.आणि जिंनिंग मध्ये काम सुरू आहे.एवढे मोठे बांधकाम आणि लागणारे मटेरियल , सर्व बांधकाम करण्यासाठी रेतीची आवश्यकता असते.पण हीच रेती ,रेती तस्कर बिनधास्त पुरवठा करीत आहेत.तलाठी कार्यालय मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने महसूल विभागाचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहेत.जिनींग बांधकाम करण्यासाठी रेतीची,गिटटी ,बोल्डर,भर भरण्यासाठी मुरुम हे सर्व मटेरियल एकतर वन विभागाच्या किंवा महसूल विभागाचे परीसरातुन चोरी करीत वाहतूक करणारे बिनधास्त पुरवठा करीत असल्याचे समजते.हा परीसर रेती तस्कराचा अड्डा बनला असल्याचे नागरीक सांगतात.तलाठी ,मंडल अधिकारी मात्र प्रत्यक्षात काहीही करायला तयार नाही.असा आरोप नागरिकांनी केला आहे.