Home आपला जिल्हा देवाडा तलाठी कार्यालय कुलूप बंद ! कर्मचारी मारतात मुख्यालयाला दांडी.....

देवाडा तलाठी कार्यालय कुलूप बंद ! कर्मचारी मारतात मुख्यालयाला दांडी.. कार्यालयासमोर गवताचं जंगल !

57
0

देवाडा…

प्रतिकार न्यूज

राजुरा तालुक्यातील बाजारपेठ म्हणून देवाडा या गावाची ओळख आहे . मात्र अधिकारी मुख्यालयी राहत नाही.

देवाला गावात बाजार पेठ ,मोठी असुन या ठिकाणी सोयाबीन, कापूस विक्रीसाठी शेतकरी आणत असतात, शेतमजूर सुध्दा बाजारात येत असतात अशा या गावात शासकीय आफिस आहे.पण आफीसात खुर्चीवर कोणी बसून दिसत नाही.या भागात जंगलात रेती मुरुम,दगड फाडी फोडून अनेक कुटूंब आपले पोट भरतात , मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे तलाठी कार्यालय या ठिकाणी सर्वांना काम असते , शासनाच्या वतीने या ठिकाणी तलाठी कार्यालय आहे . परंतु येथे तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने , नागरिकांना मोठा ,त्रास सहन करावा लागत आहे.या कार्यालयासमोर गवत ,कचरा ,असल्याने , तलाठी कार्यालय कीती दिवसांपासून बंद आहे असं वाटते .रेती उत्खनन साठी या परीसरात मोठ्या प्रमाणात रेती चोरी वाहतूकदार करीत आहेत.वन विभाग यांचेही कार्यालय आहे.पण ते सुध्दा राहत नाहीत.एकंदरीत चोरांना मोकळं रान मिळाले आहे.जेवढ लुटता येते तेवढं लुट करणारे तयार होत आहे.

प्रतीकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here