Home कृषी राजुरा बाजार समिति मार्केट मध्ये शेतकरी बांधवांची आर्थिक लूट ♦️ सोयाबीन खरेदीत...

राजुरा बाजार समिति मार्केट मध्ये शेतकरी बांधवांची आर्थिक लूट ♦️ सोयाबीन खरेदीत संगणमत करुन व्यापारी बोली बोलतात ?

5
0

राजुरा….

प्रतिकार….

राजुरा बाजार समिती मार्केट मध्ये शेतकरी बांधवांची आर्थिक लूट केली जात आहे.

 

राजुरा मार्केट यार्ड येथे 12 ते 15 व्यापारी असल्यांचे समजते.आज दिनांक दोन नोव्हेंबरला दुपारी लीलाव सुरू झाला त्या वेळेस फक्त तिन ते चार व्यापारी बोली बोलताना दिसत होते.तर काही व्यापारी घरीच सोयाबीन खरेदी करीत असल्याचे‌ चित्र पहावयास मिळत होते.बाजार समिती मार्केट मध्ये बोली बोलताना फक्त तिन चार व्यापारी बोली बोलताना सोयाबीन भाव पाडून सोयाबीन खरेदी करीत आहेत.आज जेवढे सोयाबीन खरेदी केले त्याची माहिती घेतली तर लक्षात येईल की कीती व्यापारी बोली बोलत होते.मार्केट मध्ये जवळपास हजार क्विंटल चे जवळपास सोयाबीन असेल परंतु एवढा. माल बोली बोलुन खरेदी करण्यासाठी दिवस बुडतो आणि अंधार होतो.मग मोजमाप केव्हा करावयाचे ,ज्या ठिकाणी सोयाबीन लिलावासाठी ठेवले आहे.त्या ठिकाणी सोयाबीन मोजमाप करण्यासाठी अंधार असतो.समजा शेतकरी बांधवांचे सोयाबीन मोजमाप करण्यासाठी एका जागेवरून दुसरीकडे ढुलाई केली तर त्याचे पैसे कोण देणार, दिवसभरात व्यापाऱ्यांनी बोली बोलताना, सोयाबीन चे भाव पाडून बोली बोलतात,?फक्त दुपारच्या सत्रात तिन चार च व्यापारी कसे ,मग या लोकांनी कोणत्या भावात खरेदी केली जात होती.त्याचा पुरावा बाजार समितीच्या कार्यालयात उपलब्ध आहे.सोयाबिन भाव चार हजार चे वर आणि 3500रुपये एक क्विंटल प्रमाणे. किती खरेदीत सोयाबीन खरेदी केले.याचा अंदाज घेतला तर लक्षात येईल शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने आर्थिक नुकसान करतात हे दिसून येते.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here