चंद्रपुर…
चंद्रपुर जिल्हात नगर पालिका, पंचायत समिती कार्यालयात जाहिरात धोरण कपाटात बंद !
राज्य सरकारने शासकीय कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करताना ,एक जाहिरात धोरणं ठरविले आहे . त्याप्रमाणे स्थानीक स्वराज्य संस्था कार्यालयात विवीध प्रकारचे काम करायचे असते ,त्यासाठी कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे सविस्तर निवीदा साठी माहिती द्यावी लागते.त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी कामाची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्यातील साप्ताहिक, दैनिक वृत्तपत्र यांना रोटेशन पध्दतीने जाहिरात देण्यात येते, पन्नास लाखापर्यंत कामाची कीमत असलेल्या कामाची जाहिरात क वर्ग साप्तहीक,आणि ब वर्ग दैनिक यांना देण्याचे धोरण ठरले आहे . त्याप्रमाणे जिल्हा माहिती अधिकारी जिल्ह्यात शासन मान्य यादीवर असलेले वृत्तपत्र यांना रोटेशन पध्दतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी जाहिरात वाटप करतात.त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अनेक ठेकेदाराला माहीत होते.आणि टेंडर भरतात.त्यामुळे काम वाटपात स्पर्धा सुरू होते.परंतु नगरपरिषद कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयात जाहिरात धोरण कपाटात बंद ठेवून ,आपल्या जवळच्या व्यक्तीला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो.आणि सुरू होतो भ्रष्टाचार , निकृष्ट दर्जाची कामे , जिल्ह्यात झोलाझेंडी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.या कार्यालयात मोठ्या प्रमाणात ई निविदा चे नावांवर गैरप्रकार केला जातो.या कामासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी संगनमत करून आर्थिक लुट करीत आहे.यांना जर भ्रष्टाचार करायचा नाही.तर मग जिल्हा माहिती कार्यालय मार्फत जाहिरात का प्रसिद्ध करीत नाही.नगर पालीका , पंचायत समिती मधील अधिकारी हे लोकप्रतिनिधी चे गुलाम आहेत की काय , शासनाने ठरवून दिलेल्या जाहिरात धोरण कपाटात बंद ठेवतात ,आणि आपल्या मर्जीतील लोकांना काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो.असा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे.
प्रतिकार न्यूज
.